रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाने थैमान घातले असून दोन ठिकाणी दरडी कोसळून 60 जणांचा मृत्यू झाला आहे. तर घाटमाथ्यावरील जिल्ह्यांनाही पावसाने झोडपून काढल्याने नद्यांच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे. दरम्यान, कोकणातील तीन जिल्ह्यांना तसेच गोव्याला, कर्नाटकातील किनारपट्टीवरील जिल्हे, बेळगावसह पुणे, मध्य महाराष्ट्राला पुढील दोन तास मध्यम ते अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. (Moderate to High Threat over Raigarh, Ratnagiri, Sindhudurg, Goa, Pune and Ahmadnagar districts of Madhya Maharashtra in next 06 hours.)
तसेच उत्तराखंड, कोकण, गोवा, कर्नाटक किनारपट्टी, मध्य प्रदेश, झारखंड, ओडीशामध्ये पुढील 36 तास मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भासह या भागात पूरस्थिती उद्भवण्याचा धोका हवामान खात्याने वर्तविला आहे.
दरम्यान, महाड तालुक्यातील तळीये गावात गुरुवारी काेसळलेल्या दरडीमध्ये (Mahad Landslide) 49 जणांचा मृत्यू झाला आहे. तर पाेलादपूर येथील पडलेल्या दरडीमध्ये 11 असा एकूण 60 जणांचा बळी गेला आहे. पोलादपूर येथील किरकाेळ जखमींना महाड, पाेलादपूर, माणगाव आणि एमजीएम येथील रुग्णालयात दाखल केले आहे. तळीये हे गाव दरड प्रवण गावामध्ये नव्हते, जी गावे आहेत त्या गावातील नागरिकांना आधीच सर्तकतेच्या सुचना दिल्या हाेत्या, असेही त्यांनी स्पष्ट केले.