मुंबई : मुंबईसह कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पुन्हा धुवाधार पाऊस बरसला. पावसाचे रौद्ररूप पाहून २९ आॅगस्टसारखी स्थिती पुन्हा निर्माण होते की काय, या भीतीने मुंबईकरांना धडकीच भरली. लांब पल्ल्याच्या रेल्वेसह विमानसेवाही विस्कळीत झाली होती. कोकणातही अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. येत्या ७२ तासांसाठी मुंबई शहर आणि उपनगरात मुसळधार पाऊस पडेल, असा इशारा कुलाबा वेधशाळेने दिला आहे.मुंबई शहर आणि उपनगरात मंगळवारी सकाळीच ढग दाटून आले. भर दुपारी सर्वत्र काळोख पसरला. अरबी समुद्राहून वाहणारे वारे आणखी वेगाने वाहू लागले. पश्चिम उपनगरासह पूर्व उपनगरातून शहरात दाखल होणाºया पावसाने सर्वप्रथम बोरीवली, मालाड, गोरेगाव, अंधेरी, साकीनाका, पवई, मुलुंड, भांडुप, घाटकोपरसह वांद्रे-कुर्ला परिसराला झोडपून काढले. दुपारी सुरू झालेला मुसळधार पाऊस रात्री उशिरापर्यंत सुरू होता. काही लोकल रद्द झाल्या.रत्नागिरीत हर्णे येथे ३२ तासांत ५२९ मिमी पाऊस झाला. आंजर्ले (ता. दापोली) येथे तीन बोटी बुडाल्या असून त्यावरील खलाशांना वाचवले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक गावांत पूरस्थिती निर्माण झाली आहे. माणगाव खोºयातील आंबेरी येथील पुलावर पुराचे पाणी असल्याने २७ गावांचा संपर्क तुटला. मालवण तालुक्यातील मसुरे, बागायत, कावा या गावांतही पूरस्थिती आहे. नवी मुंबईतही जोरदार पाऊस झाला. सततच्या पावसामुळे रायगडमध्ये सावित्री, अंबा, कुंडलिका या नद्यांची पातळी वाढली आहे.>मराठवाड्यात बरसणारयेत्या २४ तासांत मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होईल. मुंबईत मुसळधार पाऊस पडेल.>विमानसेवेवर परिणाम : विमाने उतवण्यासाठी अडचणी येत असल्याने चार विमाने वळवण्यात आली होती. तर काही विमाने अर्धा ते एक तास उशिराने उड्डाण घेत होती. मुंबईकडे येणारी विमाने अहमदाबाद, जयपूर, दिल्ली, चेन्नईकडे वळवण्यात आली आहेत. संध्याकाळी स्पाइस जेटचे वाराणसी-मुंबई विमान लँड होताना धावपट्टीवरून सरकले आणि त्याचे चाक चिखलात जाऊन रुतले. सुदैवाने यात कोणीही जखमी झाले नव्हते. प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले.>ठाणे जिल्ह्यात जोरदार पाऊसठाणे, कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर परिसरात मंगळवारी दुपारनंतर पावसाने जोरदार हजेरी लावली. दुपारच्या सत्रांतील विद्यार्थ्यांचे सायंकाळी घरी परततानाहाल झाले. रेल्वे भरून येत असल्याने ठाणे स्थानकात गर्दी झाली होती.पालघरमध्ये १ ठारपालघर जिल्ह्यातील टेम्भी गावात चक्रीवादळात सापडून किनाºयावर नांगरलेल्या ७ बोटी चिरल्या. बोटीचा भाग अंगावर पडल्याने संदीप तांडेल (५०) यांचा मृत्यू झाला.>पश्चिम महाराष्ट्रातही मुसळधारपश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर, सांगली, सातारा आणि पुणे जिल्ह्यातही मुसळधार पाऊस झाला. कोल्हापूर जिल्ह्यात गगनबावड्यासह धरणक्षेत्रात जोरदार पाऊस सुरू आहे. राधानगरी धरणाचे सात स्वयंचलित दरवाजे उघडल्याने उपनद्यांच्या पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. पंचगंगा नदीची पातळी २२ फुटांपर्यंत पोहोचली असून, १५ बंधारे पाण्याखाली गेले आहेत.
पावसाचे पुन्हा धुमशान!, मुंबई, कोकणात अतिवृष्टीचा इशारा : प. महाराष्ट्रातही मुसळधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2017 7:12 AM