शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
2
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
3
भाजप सरकारचा मुंबई लुटण्याचा डाव, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचा आरोप 
4
कांद्याचे भाव का वाढले, सोयाबीनच्या किमतीचं काय? कृषिमंत्र्यांनी दिलं असं उत्तर 
5
२५०० रुपयांच्या SIP नं बनले १ कोटी रुपये; SBI च्या 'या' म्युच्युअल फंडानं दिले छप्परफाड रिटर्न
6
Vidhan Sabha election 2024: अचलपूर मतदारसंघात बच्चू कडू इतिहास रचणार का? 
7
श्रीगोंद्यातील राहुल जगतापांना मोठा धक्का; शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून निलंबन
8
मृणाल दुसानिसने पतीसोबत ठाण्यात सुरु केलं स्वतःचं रेस्टॉरंट, मराठी कलाकारांनी लावली उपस्थिती
9
नांदेड लोकसभा पोटनिवडणूक : विधानसभेच्या उमेदवारांवर लोकसभेच्या विजयाचा ‘टेकू’
10
Success Story : रतन टाटांच्या कंपनीत करायचे नोकरी, एका खोलीतून सुरू केला बिझनेस; आज आहेत १३,५०० कोटींचे मालक
11
Maharashtra Vidhan Sabha 2024:  उमेदवार किती कोट्यधीश, किती शिकलेले?
12
घटना बदलण्याचे पाप काँग्रेसचे, त्यांनी शेतकरी, मजुरांकडे दुर्लक्ष केले -नितीन गडकरी
13
'नौटंकी करून मते मिळत नाहीत, मविआकडून दिशाभूल', देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात शक्तिप्रदर्शन
14
कोल्हापूरमध्ये जनसुराज्य शक्तीच्या उमेदवारावर जीवघेणा हल्ला, धारदार शस्त्रांनी केले वार 
15
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!
16
'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्याचं शुभमंगल सावधान! लग्नाचे फोटो आले समोर
17
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
18
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
19
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
20
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?

मुंबईसह राज्यभरात पावसाची पुन्हा दमदार हजेरी; उन्हाच्या झळांनी त्रस्त झालेल्या नागरिकांना दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2017 8:54 AM

 मुंबईसह राज्यभरात पावसाने पुन्हा दमदार हजेरी लावली आहे.

ठळक मुद्दे मुंबईसह राज्यभरात पावसाने पुन्हा दमदार हजेरी लावली आहे.मंगळवारी मध्यरात्रीपासून राज्याच्या अनेक भागात विजाच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस सुरू आहे. पावसाच्या जोरदार पुनरागमनामुळे बळीराजा काहीप्रमाणात सुखावला असून, उन्हाच्या झळांनी त्रस्त झालेल्या नागरिकांनाही दिलासा मिळाला आहे.

मुंबई, दि. 13-  मुंबईसह राज्यभरात पावसाने पुन्हा दमदार हजेरी लावली आहे. मंगळवारी मध्यरात्रीपासून राज्याच्या अनेक भागात विजाच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस सुरू आहे. पावसाच्या जोरदार पुनरागमनामुळे बळीराजा काहीप्रमाणात सुखावला असून, उन्हाच्या झळांनी त्रस्त झालेल्या नागरिकांनाही दिलासा मिळाला आहे. मुंबईसह राज्यात अनेक ठिकाणी पावसाने कमबॅक केलं आहे. ठाणे, कल्याण, डोंबिवली परिसरात मध्यरात्रीपासून विजांच्या कडकडासह मुसळधार पाऊस सुरू आहे. तर अलिबाग, पेण, पनवेल, कर्जतमध्ये ही पावसाच्या सरी बरसत आहेत.पालघरमध्ये पहाटेपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. सातारा जिल्ह्यात अनेक ठिकाणी पाऊस पडतो आहे. कोल्हापूर, नाशिक आणि लातुरातही मुसधळधार पावसाने चांगलंच झोडपून काढलं आहे. बीडमध्येही काल मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे. पावसानं शहरातील सर्व नाले ओसंडून वाहत आहेत. मुंबईमध्ये पहाटेपासून मुसळधार पाऊस असला तरी त्याचा परिणाम रेल्वे सेवेवर झालेला नाही. तिन्ही मार्गावरील लोकल सेवा सुरळीत सुरू असल्याचं समजतं आहे. 

दुसरीकडे उरणमध्ये पावसाची रिपरिप पाहायला मिळते आहे तर विजांचा कडकडाट मात्र कायम आहे.  तर मुसळधार पावसाने नवी मुंबईकरांनाही काही प्रमाणात दिलासा दिला आहे. विजांच्या कडकडासह मुसळधार पाऊस नवी मुंबईमध्ये सुरू आहे. वसई-विरार-मीरा भाईंदरमध्ये पावसाची रिपरिप सुरू असून रायगडमध्ये काही भागात मुसळधार पाऊस पडतो आहे. पुढील ३ ते ४ तास मुंबईसह कोकणात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडले, अशी माहिती मुंबई प्रादेशिक हवामान विभागाकडून मिळते आहे.

गेल्या दोन दिवसांपासून मुंबईकरांना उन्हाची झळ सोसावी लागत होती.पण मंगळवारी रात्री झालेल्या मुसळधार पावासानं हवेत गारवा निर्माण झाला आहे. मध्यरात्रीपासून मुंबईत तुफान पावसानं हजेरी लावली. तब्बल 1 ते दीड तास मुंबईत विजांच्या कडकडाटासह पाऊस बरसला. अजूनही मुंबईतल्या अनेक उपनगरांत पावसाची रिपरिप सुरुच आहे. त्यामुळे मुंबई गारेगार झालेली पाहायला मिळते आहे. नवी मुंबईतही विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस बरसतो आहे. मध्यरात्री 2 च्या सुमारास विजांच्या कडकडांटासह पावसाला सुरुवात झाल्यानंतर कामोठे आणि आसपासच्या परिसरातील वीजपुरवठा खंडीत करावा लागला होता. 

नाशिकमध्येही काल रात्री विजांच्या कडकडाटांसह मुसळधार पावसानं हजेरी लावली. पावसाचा जोर पाहता शहरातील अनेक भागांमधला वीजपुरवठा खंडीत झाला आहे. गेल्या दोन्ही वेळेस मुसळधार पावसामुळे नाशकात पूरपरिस्थिती ओढवली होती. त्यामुळे आता तिसऱ्यांदाही पावसाचा जोर पाहता नागरिकांना सर्तकतेचा इशारा देण्यात आला आहे. 

टॅग्स :Mumbaiमुंबई