नरेंद्र रानडे - सांगली -ग्लोबल वॉर्मिंगमुळे मागील काही महिन्यांपासून जिल्ह्यातील बहुतांशी भागात अवकाळी पाऊस आणि गारपिटीचे प्रमाण वाढत चालले आहे. हवामान खात्याने केलेल्या नोंदीनुसार मागील दहा महिन्यांचा आढावा घेतला, तर जिल्ह्यात कोठे ना कोठे वरुणराजाचा मुक्काम हमखास आहेच. अपवाद केवळ फेब्रुवारी महिन्याचा. अवेळी पडणाऱ्या या पावसाने शेतकरी मात्र धास्तावला असून, त्यांच्या पिकांचे अपरिमित नुकसान झाले आहे. भारतीय ऋतुचक्रानुसार जून ते आॅक्टोबर हे पावसाचेच महिने आहेत. २०१४ मध्ये या पाच महिन्यात जिल्ह्यात सरासरी ५१०.६ मि.मी. इतका पाऊस झाला, तर नोव्हेंबर ते मार्च या कालावधित अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. वरुणराजाच्या वाढत्या मुक्कामाने शेतकरी मात्र हवालदिल झाला आहे. त्याने कष्टाने लावलेली पिके डोळ्यादेखत जमीनदोस्त होताना त्याला पाहावी लागत आहेत. हवामान खात्याच्या नोंदीनुसार जिल्ह्याची स्थिती पाहिल्यास नोव्हेंबर महिन्यात सरासरी ४७.६ मि.मी., डिसेंबरमध्ये २८.३ मि.मी., जानेवारीत ६.३ मि.मी., तर मार्चमध्ये ६५.७ मि.मी. इतका पाऊस पडला आहे. अवकाळी पावसाने मिरज, खानापूर, आटपाडी, वाळवा, शिराळा, तासगाव या तालुक्यात शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. शासनस्तरावरून पंचनामे करण्याचे काम पूर्ण झाले असले, तरी अद्यापपर्यंत त्यांच्या हातात शासकीय मदत मिळालेली नाही. बदलत्या शहरीकरणाच्या संकल्पनेमुळे वाहने आणि अन्य प्रकारांनी वातावरणातील प्रदूषणात भर पडत आहे. परिणामी तापमानात वाढ होत आहे. साहजिकच ऋतुचक्र बदलत चालले आहे. हे बदल केवळ भारतातच नव्हे, तर जगातदेखील होत आहेत. याला प्रतिबंध घालणे हे आपल्यासमोरील एक आव्हानच आहे. - सुभाष आर्वे, हवामानतज्ज्ञ, उपाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघ, पुणे.भविष्यात अवकाळी पावसाने होणारे नुकसान कमी होईल, यासाठी शेतकऱ्यांनी पारंपरिक पीक पध्दतीत बदल केला पाहिजे. संभाव्य धोका लक्षात घेऊन काही शेती बंदिस्त पध्दतीने केली पाहिजे. विमा उतरविलेल्या पिकांची नुकसानभरपाई शासनाने वैयक्तिक नुकसान गृहीत धरुन दिली पाहिजे. - संजय कोले, प्रदेश संघटक, शेतकरी संघटना युवा आघाडी.जून ते आॅक्टोबरमधील तालुकानिहाय आकडेसरासरी पाऊस (मि.मी.मध्ये) मिरज४९२.०तासगाव४७६.०क. महांकाळ४५७.०जत४५७.७विटा४९४.९आटपाडी३५५.०पलूस४७६.०कडेगाव४४७.०वाळवा५६५.८शिराळा८८४.७ अवकाळी पाऊस (मि.मी.मध्ये) मिरज२७७.७तासगाव७०५.०क. महांकाळ२३९.७जत२९१.४विटा६०३.०आटपाडी२०७.०पलूस४०८.०कडेगाव४५६.५वाळवा७०८.४शिराळा३९१.०
जिल्ह्यात पावसाचा मुक्काम वाढला
By admin | Published: April 27, 2015 11:03 PM