शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
2
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
3
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
4
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
6
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
7
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
8
तणाव वाढला! मणिपूरमध्ये ‘एनपीपी’ने काढला सरकारचा पाठिंबा; काँग्रेस आमदारांची राजीनाम्याची तयारी
9
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
10
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
11
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
12
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
13
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
14
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
15
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
16
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
17
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
18
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
19
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
20
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव

कमी दाबामुळे पावसाची विश्रांती

By admin | Published: July 15, 2016 12:41 AM

कमी दाबाचा पट्टा विरून गेल्याने राज्यात पावसाने काहीशी विश्रांती घेतली आहे़ त्यामुळे येत्या काही दिवसांत राज्यात मोठ्या पावसाची शक्यता नाही़ अरुणाचल प्रदेश

पुणे : कमी दाबाचा पट्टा विरून गेल्याने राज्यात पावसाने काहीशी विश्रांती घेतली आहे़ त्यामुळे येत्या काही दिवसांत राज्यात मोठ्या पावसाची शक्यता नाही़ अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, हिमालयाच्या रांगा, बिहार, पूर्व उत्तर प्रदेशात अनेक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे़ राज्यात कोकणामध्ये काही ठिकाणी, तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे़ गेल्या २४ तासांत कोकण, गोवा व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला़ राधानगरी ७०, भिरा ६५, महाड ६४, महाबळेश्वर ६२, कोयना २१०, शिरगाव, दावडी, ताम्हिणी ११०, लोणावळा, डुंगरवाडी ७०, वळवण ६०, आंबोणे, कोयना (पोफळी) ५०, खोपोली ४०, शिरोटा, खंद येथे ३० मिलिमीटर पावसाची नोंद झाली.आहे़ कोकणातील कर्जत, खेड ६०, मंडणगड ५०, सांगे ४०, चिपळूण, देवगड, जव्हार, कणकवली, माणगाव म्हसळा, पोलादपूर, रोहा, संगमेश्वर, देवरुख, शहापूर, सुधागडपाली, वैभववाडी येथे प्रत्येकी ३० मिमी पाऊस झाला़ मध्य महाराष्ट्रातील गगनबावडा ४०, हरसूल, जावळीमेधा, वेल्हा ३०, आजरा, अक्कलकुवा, चंदगड, इगतपुरी, ओझरखेडा, पन्हाळा, पाटण, पौड मुळशी, पेठ येथे प्रत्येकी २० मिमी पाऊस झाला़ विदर्भात भामरागड, गडचिरोली, कारंजा, पातूर, सालेकसा येथे प्रत्येकी १० मिमी पाऊस झाला़ राज्यात गुरुवारी दिवसभरात काही शहरांत पावसाच्या हलक्या सरी पडल्या़ पुणे ०़३, महाबळेश्वर १७, नाशिक २, सांगली ०़२, मुंबई १८, अलिबाग १०, रत्नागिरी २, पणजी ५, डहाणू ०़४, उस्मानाबाद ०़२ मिमी पावसाची नोंद झाली आहे़ पुढील दोन दिवसांत कोकण, गोव्यात बऱ्याच ठिकाणी व मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी, तर मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाच्या शक्यतेचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे़ पुणे व मुंबई परिसरात पावसाच्या एक-दोन सरी पडण्याची शक्यता आहे़