शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
2
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
4
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
5
Maharashtra Election 2024 Live Updates: 'लाडकी बहीण'सारख्या योजनांचे सरकारने नीट नियोजन केलं आहे- मुख्यमंत्री शिंदे
6
हमीभावाबाबत पंतप्रधान मोदींची महत्त्वाची घोषणा; राज्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा
7
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
8
Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
9
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
10
"एक माणूस म्हणून तो...", इब्राहिमसोबतच्या नात्यावर पलक तिवारीने केलं होतं भाष्य
11
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
12
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
13
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
14
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
15
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
16
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
17
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
18
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
20
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...

पावसाचा मच्छिमारांना फटका

By admin | Published: March 01, 2015 10:16 PM

नौका बंदरात उभ्या : बाजारपेठेत मच्छिची आवक घटली

मालवण : शनिवारी सायंकाळपासून सुरू झालेल्या अवकाळी पावसाचा परिणाम आंबा, काजू बागायतदारांबरोबरच मत्स्य व्यवसायावरही झाला असून अवकाळी पाऊस आणि त्यातच सोसाट्याचा वारा यामुळे मच्छिमारांनी आपल्या नौका बंदरात उभ्या करून ठेवल्या. त्यामुळे बाजारपेठेत माशांची आवक घटली असून माशांचे भाव सर्वसामान्यांना परवडणारे नाहीत. समुद्रात ताशी ५० किलोमीटर वेगाने वाहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला असून रविवारी दुपारनंतर पुन्हा पावसाने हजेरी लावल्याने हवेत गारठा होता. ही परिस्थिती आणखी आठवडाभर राहणार असल्याची शक्यता जाणकार मच्छिमारांनी व्यक्त केली आहे.किनारपट्टीवर शनिवारी सायंकाळपासून वातावरणात बदल झाला होता. अचानक बदललेल्या वातावरणामुळे पहाटे १.३० वाजल्यापासून रिमझिम पावसाला सुरूवात झाली. यानंतर पहाटे ४ वाजेपर्यंत किनारपट्टी भागात संततधार सुरू होती. रविवारी दुपारपासूनही पुन्हा पावसाने हजेरी लावली. दिवसभर ढगाळ वातावरण व हवेत गारठा असल्यामुळे त्याचा परिणाम आंबा बागायती तसेच मासेमारी व्यवसायावरही दिसून येणार आहे.समुद्रात ४५ ते ५० किलोमीटर वेगाने वारे वाहतील, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. समुद्रातील अचानक बदललेल्या हवामानामुळे मच्छिमारांनी आपल्या बोटी बंदरात उभ्या करून ठेवल्या आहेत. यामुळे मच्छिमारी व्यवसाय थंडावला आहे. यामुळे बाजारात माशांची आवक घटली असून माशांचे भावही सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहेत. दोन दिवसांपूर्वी ३०० ते ३५० रूपये किलो दराने विकली जाणारी सुरमई आज ५०० रूपये किलो दराने विकली जात होती. बांगुरडी १०० रूपये वाटा तर धोडये ५० रूपये वाटा अशा चढ्या दराने बाजारात मासे विकले जात होते. मासे महाग झाल्यामुळे मत्स्य खवय्यांनी चिकन-मटणवर जोर दिल्याचे दिसून आले. बाजारात भाज्यांचेही भाव दिवसभरात वाढलेले होते.किनारपट्टीवर ढगाळ वातावरण अधूनमधून पाऊस व जोरदार वारा असाच आठवडाभर सुरू राहणार असल्याचा अंदाज स्थानिक जाणकार मच्छिमारांनी व्यक्त केला आहे. मासेमारीबरोबरच या बदललेल्या वातावरणाचा फटका आंबा बागायतीला बसणार आहे. ढगाळ वातावरणामुळे मोहोरांवर बुरशीचा प्रादूर्भाव वाढणार आहे. तसेच तुडतुडा व किडरोगाच्या वाढीस ढगाळ वातावरण पोषक असल्यामुळे बागायतदारांची चिंता वाढली आहे. सध्या मुंबई मार्केट हजार ते दीड हजार रूपये डझन दराने आंबा विकला जात आहे. कोकणात अवकाळी पडलेल्या पावसामुळे तयार झालेल्या आंबा फळांवर विपरीत परिणाम दिसून येणार आहे. गेल्यावर्षी फळमाशीच्या कारणावरून पाश्चिमात्य देशांनी आंबा नाकारल्यामुळे आंबा बागायतदार संकटात सापडला होता. यावर्षी अवकाळी पावसामुळे आंबा बागायतदारांवर पुन्हा आपत्ती आली आहे.कृषी विभागाने अवकाळी पावसामुळे झालेल्या आंबा बागायतदारांच्या नुकसानीची पाहणी करून शासनाला तसा अहवाल पाठविण्याची मागणी आंबा बागायतदारांकडून सुरू झालीआहे. (प्रतिनिधी)मालवणात चिखलाचे साम्राज्य शनिवारपासून सुरू झालेल्या पावसामुळे मालवण शहरात ठिकठिकाणी चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. शहरात भुयारी गटार योजनेचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. या अनेक ठिकाणी रस्ते खोदण्यात आले आहेत. पावसामुळे या ठिकाणी चिखल पसरला आहे. याचा फटका वाहनचालक व पादचाऱ्यांना बसत आहे. पावसामुळे शहरात व ग्रामीण भागात विजेचा लपंडाव सुरू झाला आहे. दिवसभरात बीएसएनएलची सेवा मात्र सुरळीत सुरू होती.