15 हजार हेक्टरवरील पिके जमीनदोस्त झाली आहेत
पुणो : नाशिक, उत्तर व पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडय़ातील काही भागाला अवकाळी पावसाने झोडपून काढले. या पावसाने द्राक्ष, गहू, कांदा, डाळिंब या पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाल़े नाशिकमध्ये सर्वाधिक नुकसान झाले असून, जवळपास 15 हजार हेक्टरवरील पिके जमीनदोस्त झाली आहेत़ इतर भागांतील नुकसानीची माहिती घेण्याचे काम सुरू असल्याने बाधित क्षेत्रत आणखी वाढ होण्याची शक्यता आह़े
राज्यातील काही भागांत गुरुवारी
पावसाने हजेरी लावली होती. तर शुक्रवारीही नाशिक, सातारा व सोलापूर,
पुणो आणि औरंगाबादसह मराठवाडय़ातील
काही भागांत अवकाळी फेरा झाला.
नाशिकातील सटाणा, नांदगाव, येवला, मालेगाव, दिंडोरी व देवळा या तालुक्यांत पावसाने थैमान घातल़े या भागात द्राक्ष, कांदा, गहू व डाळिंब या पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले, तर 15 हजार हेक्टरवर क्षेत्र बाधित झाल़े धुळे, पुणो, सोलापूर, सातारा या भागातील पिकांचे नुकसान झाले आहे.