गोंदिया : बुधवारी सकाळपासूनच गोंदिया, भंडारा जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण होते. आज दुपारी 4 च्या सुमारास गारांसह अवकाळी पावसाने हजेरी लावली.
गोंदियामध्ये हवामान विभागानेही बुधवार व गुरूवारी वादळी पावसाचा अंदाज वर्तविला आहे. दुपारी ४.३० वाजताच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पावसाला सुरूवात झाली. जवळपास १० ते १५ पंधरा मिनिटे पाऊस झाल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला. या अवकाळी पावसाचा फटका रब्बी पिकांना बसण्याची शक्यता आहे.
भंडरा जिल्ह्यात दुपारी ४ वाजतापासून वादळी पावसासह गारांचा वर्षाव झाला. भंडारा शहरात टपोर थेंबाचा पाऊस व तुरीच्या आकाराच्या गारा पडल्या. मोहाडी तालुक्याच्या वरठीतही गारांचा वर्षाव झाला.