शहरं
Join us  
Trending Stories
1
संजूचं शतक; आफ्रिकेत फिरकीची 'करामत' अन् सूर्याच्या कॅप्टन्सीत टीम इंडियाचा विजयी धडाका कायम!
2
ठाण्यात बिल न देता हॉटेलात जायची सवय तेच दावोसमध्ये केले; जयंत पाटलांचा शिंदेंना जोरदार टोला 
3
रावेरचे माजी आमदार आर. आर. पाटील यांचे निधन
4
मिस्ट्री स्पिनरची जादू; दक्षिण आफ्रिकेच्या ताफ्यातील स्फोटक फलंदाज ठरले फुसका बार!
5
मी शिवसेना सोडली तेव्हा ३५ आमदार, १५ खासदार माझ्याकडे आलेले...; राज ठाकरेंचा एकाच वाक्यात उद्धव, शिंदेंवर नेम
6
Aiden Markram नं रुबाब दाखवला; पण Arshdeep Singh समोर तो फिका ठरला (VIDEO)
7
फुटबॉल सामन्यावेळी इस्रायली नागरिकांवर हल्ला; १२ जखमी, नेतन्याहूंनी नेदरलँडला विमाने पाठविली
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'समोरासमोर चर्चेला तयार', पृथ्वीराज चव्हाणांचं अमित शाहांना खुलं चॅलेंज
9
Sanju Samson ची सेंच्युरी! एका डावात ३ खास रेकॉर्ड्सला घातली गवसणी
10
फक्त एक षटकार मारला त्यातही सुर्या भाऊची हवा! IPL मधील २१ कोटींचा सिक्सर किंग पडला मागे
11
जानेवारीमध्ये भाजपला मिळणार नवीन राष्ट्रीय अध्यक्ष; 22 नोव्हेंबरला दिल्लीत महत्वाची बैठक
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महिलांबाबत अपमानास्पद वक्तव्यावर निवडणूक आयोग ॲक्शमोडवर,अधिकाऱ्यांना दिल्या कारवाईच्या सूचना
13
निमलष्करी दलाच्या अधिकाऱ्यांच्या रेशन मनी भत्त्याला कात्री; दर महिन्याला ४००० रुपयांचे नुकसान
14
कोणाचा फोटो लावायचा, हा आमचा निर्णय; मोदींचा फोटो न लावण्यावरुन नवाब मलिक स्पष्ट बोलले
15
"...तोपर्यंत त्यांचा निर्णय बदलणार नाही"; अजित पवारांना परत घेण्याबद्दल शरद पवारांचं विधान
16
जम्मू-काश्मीरच्या सोपोरमध्ये सैन्याची मोठी कारवाई; दोन दहशतवाद्यांचा खात्मा
17
"...तर बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंना गोळ्या घातल्या असत्या"; नारायण राणेंचं विधान
18
ऐकावं ते नवलच! १२ वर्षे जुन्या कारचे अंत्यसंस्कार, चार लाख खर्च करुन बांधली समाधी
19
सध्यातरी इतकेच महायुतीत ठरले...; अमित शाह यांच्या मुख्यमंत्री नावाच्या दाव्यावर प्रफुल्ल पटेलांची प्रतिक्रिया
20
"अरे देवा...", राहुल-अथियाने दिली गुडन्यूज; सूर्यकुमारची पत्नी देविशाच्या कमेंटनं मात्र वेधलं लक्ष

पावसाने उडविली दाणादाण

By admin | Published: August 06, 2015 1:13 AM

पश्चिम विदर्भात अतिवृष्टीची नोंद झाली असून धरणांमधून पाण्याचा विसर्ग केल्याने अकोला, वाशिम, अमरावती, बुलडा, यवतमाळ, भंडारा, वर्धा जिल्ह्यात नद्यांना पूर आला आहे

मुंबई : पश्चिम विदर्भात अतिवृष्टीची नोंद झाली असून धरणांमधून पाण्याचा विसर्ग केल्याने अकोला, वाशिम, अमरावती, बुलडा, यवतमाळ, भंडारा, वर्धा जिल्ह्यात नद्यांना पूर आला आहे. त्यामुळे अनेक गावांमध्ये पाणी शिरले तर काही गावांचा संपर्क तुटला आहे. खान्देशात जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यातील पावसाने जनजीवन विस्कळीत झाले.मराठवाड्यात सलग दुसऱ्या दिवशी पावसाची रिपरिप सुरू होती. औरंगाबाद, नांदेड, बीड, हिंगोली, उस्मानाबाद, जालना जिल्ह्यात पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. जळगाव जिल्ह्यात पावसामुळे दोन वृद्ध महिलांचा बुडून मृत्यू झाला. त्यात शामाबाई राजाराम महाजन (७०, रा. ऐनपूर ता. रावेर) आणि झामाबाई देवराम येशे (७५, रा. उत्राण ता. एरंडोल) यांचा समावेश आहे. अमरावतीमध्ये शहानूर नदीला आलेल्या पुरात मनोहर श्रीराम काळे (५५) वाहून गेले. अकोला जिल्ह्यात अदमपूर येथील रेशमा पंढरी भोजने (७५) ही महिला नागझिरी नदीला आलेल्या पुरात वाहून गेल्याने त्यांचा मृत्यू झाला. यवतमाळमध्ये ढाणकी येथील असिम खान मोबीन खान पठाण व एका २१ वर्षीय तरुणाचा सहस्त्रकुंड धबधब्यामध्ये पडून मृत्यू झाला.विदर्भात धुवाधार ! : अकोला (१७९.४ मिमी), वाशिम (१६४.२ मिमी), अमरावती (१४८.८ मिमी), बुलढाणा (१४४.२ मिमी) व यवतमाळमध्ये (८६.३ मिमी) पावसाने दाणादाण उडविली.पुराचा हाहाकार  बुलडाण्यात पूर्णा नदीला पूर ऊर्ध्व वर्धा धरणाचे १३ तर निम्न वर्धा धरणाचे ३१ दरवाजे उघडलेयवतमाळचे निळोणा धरण ओव्हर फ्लो  जळगाव जिल्ह्यात १० व अमरावती जिल्ह्यात १२ गावांचा संपर्क तुटला

जळगावमधील भाटीचे धरण ओव्हर फ्लो, हतनूर धरणाचे ४१ दरवाजी उघडले लातूर : मराठवाड्यातील पावसाचे अल्प प्रमाण पाहता विभागासाठी म्हणून कृत्रिम पावसाची कायमस्वरुपी यंत्रणा उभी करणार असल्याचे महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत सांगितले. लातूर येथील विमानतळावर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, राज्य सरकारने केलेल्या कृत्रिम पावसाच्या प्रयोगाला यश आले आहे. योगायोगाने विदर्भासह मराठवाड्यात पाऊस सुरू झाला आहे. परंतु शासनाने कृत्रिम पावसासाठीची सारी यंत्रणा लावली होती. रडार गुरुवारी येणार होते. मात्र विमानातील छोट्या रडारवर ढग पाहून आम्ही रसायनाच्या नळकांड्या फोडल्या, याला यश आले आहे. कृत्रिम पाऊस किती पडला याची आकडेवारी लवकरच हाती येईल. कृत्रिम पावसासाठी आणखी एक विमान मराठवाड्यात येणार आहे. आता काही ठिकाणी पडलेला पाऊस हा पाच मीमी पेक्षा जास्त आहे. कृषी विभागाच्या मते पाच मीमी इतका पाऊस हा पिकांच्या वाढीसाठी पोषक असल्याचे म्हणत असल्याने कृत्रिम पाऊस पुरेसा आहे.