मुंबई – हवामान खात्यानं दिलेल्या अतिवृष्टीच्या इशाऱ्यानंतर मुंबई आणि उपनगर परिसरात प्रचंड मुसळधार पाऊस पडत आहे. अनेक ठिकाणी झाडे कोलमडून पडली आहेत तर सखल भागात पाणी साचल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. चर्चगेटच्या सारख्या परिसरात पावसाने अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. वादळी वाऱ्यामुळे याठिकाणी असलेली भलीमोठी वृक्ष कोसळली आहेत.
मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पनवेल याभागात जोरदार वाऱ्यासह पावसाच्या सरी कोसळत आहेत, अनेक भागात पाणी साचलं आहे, भिवंडीत नागरिकांच्या घरात पाणी घुसलं आहे, मीरा-भाईंदर येथे रस्त्यावर पाणी साचल्याने मुंबई-अहमदाबाद वाहतूक ठप्प झाली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून मुंबईकरांना घराच्या बाहेर न पडण्याचं आवाहन
जे.जे रुग्णालयात पावसामुळे पाणी साचलं
भायखळा येथे झाड कोसळलं
पावसात अडकलेल्यांसाठी तात्पुरती व्यवस्था
अतिवृष्टीमुळे लोकल सेवा व वाहतूक काही प्रमाणात विस्कळीत झाली आहे. या पार्श्वभूमीवर रेल्वे स्टेशनवर किंवा अन्य ठिकाणी अडकून फोडलेल्या नागरिकांसाठी तात्पुरत्या स्वरुपात थांबण्याची व्यवस्था मुंबई महापालिकेने केली आहे, रेल्वे स्टेशन नजीकच्या मनपा शाळांमध्ये करण्यात आली आहे.
मरिनलाईन्स ते चर्नीरोड स्टेशनदरम्यान ओव्हर हेड तारेवर झाडं कोसळल्यानं लागली आग
उरण परिसरात जेएनपीटीच्या तीन क्युसी क्रेन्स पत्त्यासारख्या कोसळून सुमारे २०० कोटींचे नुकसान: सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही