मुंबई : गेल्या शनिवारपासून मुंबईत कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने बुधवारपासून विश्रांती घेतली आहे. मात्र तो पुन्हा परतणार आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार मुंबई शहर, उपनगरासह ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या सर्व भागांत १४ आणि १५ जुलैला म्हणजेच शनिवारसह रविवारी मुसळधार पाऊस पडणार आहे. हवामान खात्याने या दोन दिवशी रेड अलर्ट जारी केला.हवामान खात्याच्या अंदाजानुसार येत्या १४ व १५ जुलैला मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या सर्व भागांत दर दिवशी १०० मि.मी.पेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे. इतका पाऊस पडल्यास त्याचा परिणाम रस्ते आणि रेल्वे वाहतुकीवर होण्याची शक्यता आहे. चार दिवसांपूर्वी पडलेल्या पावसामुळे मुंबईतील अनेक ठिकाणी पाणी साचल्याचे घडलेले प्रकार लक्षात घेता मुंबई महापालिकेला १४ आणि १५ जुलैला मुसळधार पाऊस झाल्यास त्याची पूर्वतयारी करणे गरजेचे होणार आहे. दरम्यान, बुधवारपासून पावसाने उसंत घेतल्यामुळे मुंबईकरांची गुरुवारची सकाळ मात्र पावसाविना सुरू झाली. मुंबईतील अनेक भागांत रखरखीत ऊन पडले होते. रेल्वे आणि रस्ते वाहतुकीवर दिवसभरात कोणताही परिणाम झाला नाही. छोटी-मोठी वाहतूककोंडी सोडली तर रस्त्यांवर वाहतूक सुरळीत सुरू होती.हवामान खात्याच्या अंदाजानुसार शुक्रवारी मुंबई शहर आणि उपनगरात पावसाच्या तुरळक सरी कोसळतील.येथे मुसळधारमुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग
हवामान खात्याचा 'रेड अलर्ट', शनिवारसह रविवारी जोर‘धार’
By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2018 6:34 AM