नवी मुंबई/पनवेल : पनवेल, नवी मुंबई परिसराला शुक्रवारी पावसाने झोडपले. शहरात अनेक ठिकाणी पाणी साचले होते. दोन ठिकाणी वृक्ष कोसळले. दिवसभर सुरू असलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते.
गणोशोत्सव सुरू झाल्यापासून शहरात पावसानेही जोरदार हजेरी लावली आहे. नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रतील बेलापूर व नेरूळ परिसरास पावसाने झोडपले. या ठिकाणी अनुक्रमे 114 व 117 मिलीमीटर एवढी पावसाची नोंद झाली आहे. बेलापूर बस डेपो व अनेक ठिकाणी पाणी साचले होते. अचानक आलेल्या पावसामुळे चाकरमान्यांचा चांगलाच गोंधळ उडाला. गणोशोत्सव मंडळांचीही धावपळ उडाली. काही ठिकाणी मंडपात पाणी येवू लागले होते. नेरूळमधील डी. वाय. पाटील परिसरात व किल्ले गावठाण येथे वृक्ष कोसळला. पावसापासून वाचण्यासाठी नागरिक रेल्वे स्टेशन, बस डेपो परिसरात मोठय़ाप्रमाणात गर्दी करून उभे असल्याचे चित्र दिसत होते. दुसरीकडे वाशी व ऐरोली परिसरात मात्र तुलनेत कमी पाऊस पडला. वाशीत 99. 2 तर ऐरोलीत 19 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.
पनवेल परिसरातही सकाळपासून पावसाने जोरदार हजेरी लावली. दुपार्पयत अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचले होते. त्याचबरोबर शहरातील बावन बंगला, सहस्त्रबुध्दे हॉस्पिटल, हरीओम नगर, टपाल नाका, उरण नाका या ठिकाणी रस्त्यावर एक फुटापेक्षा जास्त पाणी साचले होते. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण झाला. इलेव्हेंडेट रोडच्या खाली अमरधाम स्मशानभूमीजवळ सव्र्हिस रोडवर पाणी साचले. नवीन पनवेल परिसरातील एचडीएफसी सर्कल, बांठिया हायस्कूलजवळ रस्त्यावर पाणी पाणी झाले होते. खांदा वसाहतीत शिवाजी चौकात पाणी साचले होते. त्याचबरोबर नालेही दुथडी भरून वाहत होते. दुपारनंतर पावसाचा जोर आणखी वाढल्याने गाढी आणि पाताळगंगा नदीच्या पाण्याची पातळी वाढली होती. कळंबोलीत अनेक सेक्टरमध्ये दीड फूट पाणी साचले होते. काही बैठय़ा घरात पाणी शिरल्याचे वृत्त आहे. त्याचबरोबर सिडकोने पावसाच्या पाण्यासाठी काढलेले चॅनेल पाणी भरून वाहत होते. मुंबई- पुणो, मुंबई- गोवा, एनएच4बी, पनवेल -सायन त्याचबरोबर द्रुतगती महामार्गावरील वाहतूक संथ झाली होती. पावसाचा जोर पाहता तहसीलदार पवन चांडक यांनी सर्व नायब तहसीलदार, मंडल अधिकारी आणि तलाठी त्याचबरोबर शासकीय अधिका:यांना परिस्थितीवर लक्ष ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. (प्रतिनिधी)
4बेलापूर व नेरूळमध्ये मुसळधार पाऊस
4शहरात दोन ठिकाणी वृक्ष कोसळले
4सीबीडी बसस्थानक, एपीएमसी व इतर ठिकाणी पाणी साचले
4पनवेलमधील शहरातील बावन बंगला, सहस्त्रबुध्दे हॉस्पिटल, हरीओम नगर, टपाल नाका, उरण नाका या ठिकाणी रस्त्यावर एक फुटापेक्षा जास्त पाणी साचले होते.
4एचडीएफसी सर्कल, बांठिया हायस्कूलजवळ रस्त्यावर पाणी पाणी झाले होते. खांदा वसाहतीत शिवाजी चौकात पाणी साचले
4गाढी आणि पाताळगंगा नदीच्या पाण्याची पातळी वाढली
4कळंबोलीत अनेक सेक्टरमध्ये दीड फूट पाणी साचले होते.
4मुंबई- पुणो, मुंबई- गोवा, एनएच4बी, पनवेल -सायन त्याचबरोबर द्रुतगती महामार्गावरील वाहतूक संथ झाली होती.