मुंबई : मुंबई वगळता राज्यभरात पावसाची तुफान बॅटिंग सुरू असून, तीन दिवस कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील काही जिल्ह्यांत मुसळधार ते अतिमुसळधार पडेल, असा इशारा हवामान खात्याने दिला असून आज, मंगळवारी रायगड, रत्नागिरी आणि सातारा या तीन जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे, तर दुसरीकडे राज्यात पूर परिस्थितीबाबत उपाययोजना म्हणून प्रशासनातर्फे एनडीआरएफ व एसडीआरएफच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.
मुंबईतही कोसळधारा रविवारी रात्री दहा ते अकरादरम्यान भायखळ्यापासून दादरपर्यंत कोसळलेल्या पावसाने मुंबईकरांना झोडपून काढले, तर याच काळात उर्वरित मुंबईत पावसाची रिमझिम सुरू होती. रात्री बारानंतर मात्र पावसाने विश्रांती घेतली होती. सोमवारी मात्र दिवसभर पावसाने विश्रांती घेतली होती.
यलो अलर्ट कुठे?मंगळवारी : ठाणे, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर, नाशिक, जळगाव, अमरावती, वर्धा, नागपूर आणि भंडारा. बुधवार आणि गुरुवारी : मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा आणि पुणे.
१ जूनपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे ३० जिल्हे व ३८५ गावे प्रभावित झाली. ११७ तात्पुरती निवारा केंद्रे तयार करण्यात आली. २० हजार ८६६ नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. ३१८ नागरिकांनी जीव गमावला. ५८०६ प्राणी दगावले. ४४ घरांचे पूर्णत: तर ३ हजार ५४० घरांचे अंशत: नुकसान झाले.
कुठे किती पथके ?
राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल मुंबई : २रायगड : १सांगली : १ राज्य आपत्ती प्रतिसाद दल नांदेड : १गडचिरोली : १