मुंबई/पुणे/सोलापूर : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे मध्य महाराष्ट्राला गुरुवारी अतिवृष्टीचा तडाखा बसला. बुधवारी झालेल्या पावसाने भीमा व कृष्णा नदीला पूर आल्याने पंढरपूर व सांगलीमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. पुरात अडकलेल्यांना सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी एनडीआरएफ पथकांची मदत घेण्यात आली.
राज्यातील लाखो हेक्टरवरील सोयाबीन व भात पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. तूर, भात या पिकांनाही अविृष्टीचा तडाखा बसला. रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने अनेक ठिकाणची वाहतूकही बंद करण्यात आली होती. पाऊस अजून सुरूच असून हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार आणखी चार दिवस असाच कोसळण्याची शक्यता आहे.पुरात झाडावर काढली रात्रकारने गावाकडे जात असताना ओढ्याला आलेल्या पुराच्या पाण्याचा अंदाज न आल्याने घात झाला. कारमध्ये असलेल्या एका मित्राचा डोळ्यादेखत जीव गेला तर दोघांना झाडाने वाचवले. संपूर्ण रात्र जीव मुठीत धरुन त्यांनी झाडावरच काढली. पूर ओसरल्यावर सकाळी मृत्यूच्या दाढेतून त्यांची सुटका झाली.मुंबईत ११५.८ मिमी. पावसाची नोंदऑक्टोबरच्या मध्यात मान्सून मुंबईसह राज्यातून परतीच्या प्रवासास सुरुवात करतो. मात्र या वर्षी बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे मान्सूनच्या परतीला ब्रेक लागला आहे. कमी दाबाच्या क्षेत्रामुळे मुंबई शहरासह उपनगरात बुधवारी रात्रीपासून गुरुवारी सकाळपर्यंत कुलाबा येथे ११५.८ तर सांताक्रुझ येथे ८६.५ मिमी. पावसाची नोंद झाली. आॅक्टोबर महिन्यात गेल्या दहा वर्षांत एवढा पाऊस पडलेला नाही. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे तेलंगणासह राज्यात मध्य महाराष्ट्राला झोडपून काढले आहे.भातपिकाचे नुकसानसिंधुदुर्ग जिल्ह्यात परतीच्या पावसाने भातपिकाची अक्षरश: नासधूस केली आहे. ५५ हजार हेक्टर पैकी तब्बल १० हजार हेक्टर क्षेत्राखालील भात पिकाची नुकसानी झाल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाने वर्तविला आहे. दरम्यान रत्नागिरी, सिंधुदुर्गसह रायगड, पालघर जिल्ह्यांमध्ये ‘रेड अलर्ट’ जाहीर केले आहे. तर बुधवारी रात्रीपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे राजापूर शहरात पुराचे पाणी शिरले.पोलीसाने वाचविले दोघांचे प्राणलातूर जिल्ह्यात निलंगा तालुक्यातील नेलवाड शिवारात पुलावरून रस्ता ओलांडत असताना पाण्यात पडलेल्या दोघांना एका पोलीस कर्मचाºयाने स्वत:चा जीव धोक्यात घालून वाचवण्याची घटना बुधवारी घडली़ कासार सिरसी पोलिस ठाण्याचे पोलिस नाईक मन्मथ धुमाळ हे मंगळवारी नेलवाड येथे तलावालगतच्या पुलावर कर्तव्यावर असताना दोघेजण वाहून जात असल्याचे त्यांना दिसले. पण दोघेही ओढ्याच्या प्रवाहात जवळपास २० फुट अंतरावर एका झाडाला अडकल्याचे पाहून धुमाळ यांनी लागलीच पाण्यात उडी घेतली़ तसेच उपस्थितांनी दोरी टाकून दोघांनाही बाहेर काढले़