शहरं
Join us  
Trending Stories
1
फडणवीसांसारखीच झाली एकनाथ शिंदेंची अवस्था?; २०२२ च्या घटनेची पुनरावृत्ती होण्याची शक्यता
2
"...म्हणून भाजपाचा मुख्यमंत्री होण्यासाठी एकनाथ शिंदेंनी रस्ता मोकळा करावा"
3
"बाप आखिर बाप होता है", मुलगी पराभूत झाल्यानंतर विजयी पित्याचे बॅनर चर्चेत!
4
 स्वबळावर बहुमताजवळ, तरीही मुख्यमंत्रिपदावर अडलंय घोडं, भाजपासमोर आहेत या अडचणी
5
ऐश्वर्या रायबाबत नणंदेचीही क्रिप्टिक कमेंट, अभिनेत्रीसोबत कधीच फोटो शेअर करत नाही; कारण...
6
Maharashtra Politics: महाराष्ट्रात बिहार मॉडेल लागू होणार नाही; भाजपच्या नेत्याने आतली बातमी सांगितली; मुख्यमंत्रिपदावर सस्पेन्स कायम
7
"काँग्रेसच्या आमदारांनी आता भाजपात विलीन व्हावं’’, भाजपच्या नेत्यानं दिला खोचक सल्ला
8
जगातील टॉप ५० हायराईज टॉवरपैकी एकात आहे Rohit Sharmaचं घर; किंमत, वैशिट्ये पाहून अवाक् व्हाल
9
Hit and Run Video: अहिल्यानगरमध्ये कारचालकाने चौघांना चिरडले, घटना सीसीटीव्हीत कैद 
10
Fact Check : बॉलिवूड अभिनेते असरानी यांचा भाजपावर टीका करणारा 'तो' Video दिशाभूल करणारा
11
'सन ऑफ सरदार' फेम दिग्दर्शकाच्या १८ वर्षीय मुलाचं भीषण अपघातात निधन
12
माढ्यातील निवडणुकीत एक घोषणा ठरली गेमचेंजर; अभिजीत पाटलांना कसा मिळाला विजय?
13
Guru Pradosh 2024: कर्जमुक्त आयुष्यासाठी करा गुरु प्रदोष व्रत; दाखवा दही भाताचा नैवेद्य!
14
Rahul Gandhi : राहुल गांधींनी अदानींच्या अटकेची केली मागणी; विरोधकांच्या गदारोळानंतर लोकसभा तहकूब
15
Infosys Employee Bonus : इन्फोसिसच्या कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; कंपनीनं केली ८५ टक्के बोनस देण्याची घोषणा
16
मनोज जरांगेंसोबत बैठका, स्टेजवर रडले; त्याच राजरत्न आंबेडकरांना किती मते मिळाली?
17
Sonia Meena IAS: माफियांनाही फुटतो घाम, सुनीता मीणांना का म्हणतात दबंग अधिकारी?
18
'बाबा...आई गेली..' अनिरुद्ध हादरला; मालिकेच्या शेवटी अरुंधतीचा होणार मृत्यू? प्रोमो व्हायरल
19
बांगलादेशात इस्कॉनला लक्ष्य का केलं जातंय? एकूण मंदिरं किती आहेत?
20
एक वृत्त आणि अदानींच्या सर्व कंपन्यांचे शेअर्स सुस्साट; पाहा का आली तेजी?

Maharashtra Rain : येत्या ४८ तासांत कोकण, मुंबईत अतिवृष्टी : हवामान खात्याचा इशारा 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 05, 2019 11:42 AM

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले असल्याने हा पाऊस होत असून याचा जोर पुढील ४८ तास राहणार आहे़.

पुणे : कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी झाली़ मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मुसळधार तर तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस झाला असून, मुंबईत बुधवारी दिवसभरात अतिवृष्टी झाली़. कोकण, गोव्यात पुढील ४८ तास मुसळधार पावसाची शक्यता असून, काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे़ .याबाबत पुणे हवामान विभागाचे प्रमुख डॉ़. अनुपम कश्यपी यांनी सांगितले की, अरबी समुद्रात महाराष्ट्र ते केरळपर्यंत द्रोणीय स्थिती निर्माण झाली असून, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले असल्याने हा पाऊस होत असून याचा जोर पुढील ४८ तास राहणार आहे़. हा पाऊस संपूर्ण राज्यात होण्याची शक्यता आहे़. त्यानंतर त्याचा जोर कमी होत जाईल़. येत्या २४ तासांत पालघर, मुंबई, ठाणे जिल्ह्यांत काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे़. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांत पुढील चार दिवस पाऊस असणार आहे़. मध्य महाराष्ट्रात पुणे व सातारा जिल्ह्यातील घाट परिसरात बुधवारी तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस होईल़. तसेच पुढील तीन दिवस घाट परिसरात जोरदार पाऊस असेल़ कोल्हापूरला पुढील ५ दिवस पावसाची शक्यता आहे़ मराठवाड्यातील बीड जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे़.  मराठवाड्यात ५ ते ८ सप्टेंबरदरम्यान हलका पाऊस असेल़ .कोकण, गोव्यात सर्वत्र सध्या जोरदार पाऊस पडत आहे़ मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मध्यम पाऊस झाला़. घाटमाथ्यावर सर्वत्र जोरदार पाऊस पडला असून, पुढील दोन दिवस मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे़. मराठवाड्यात केज ५०, भूम, वडावणी ४०, आंबेजोगाई, चाकूर, कळंब, परळी वैजनाथ ३० मिमी पावसाची नोंद झाली असून, काही ठिकाणी हलका पाऊस झाला़ विदर्भातही काही ठिकाणी पाऊस पडला़. ५ व ६ सप्टेंबर रोजी कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र व विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे़. ७ व ८ सप्टेंबर रोजी कोकण, गोवा व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे़..........

बुधवारी सकाळी संपलेल्या २४ तासांत पडलेला पाऊसखालापूर २७०, माणगाव, रोहा २६०, डुंगरवाडी २५०, खोपोली उरण २३०, लोणावळा २२०, दावडी २००, भिरा, मुरुड, ठाणे १९०, म्हसळा १८०, बेलापूर, शिरगाव, वळवण १७०, दोडामार्ग, कर्जत १५०, चिपळूण, पनवेल, श्रीवर्धन, सुधागड पाली १४०, पालघर, पेण, पेडणे, वसई, महाबळेश्वर, कोयना १३०, मुंबई (कुलाबा) १२०, शिरोटा, हर्णे, खेड, पोलादपूर, राजापूर, रामेश्वर (कृषी), उल्हासनगर ११०, अंबरनाथ, डहाणू, कणकवली १०० मिमी पावसाची नोंद झाली होती़........बुधवारी दिवसभरात सकाळी साडेआठ ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत सांताक्रूझ येथे २१४, कुलाबा ७१, अलिबाग ११२, रत्नागिरी ४१, पणजी २७, डहाणू २७, महाबळेश्वर ८४, अहमदनगर ३३, वर्धा ३९ मिमी पाऊस झाला आहे़. च्इशारा : मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यांत ५ सप्टेंबरला मुसळधार, तर काही ठिकाणी अतिवृष्टी, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात ५ सप्टेंबरला काही ठिकाणी अतिवृष्टी, तर, ६, ७ व ८ सप्टेंबरला मुसळधार पावसाची शक्यता़पुणे व सातारा जिल्ह्यांतील घाट परिसरात ५ सप्टेंबरला तुरळक ठिकाणी मुसळधार, तर पुढील तीन दिवसांत जोरदार पावसाची शक्यता़ नंदूरबार, नाशिक, बीड येथे ५ सप्टेंबरला मुसळधार पावसाची शक्यता आहे़. .........

टॅग्स :Mumbai Rain Updateमुंबई मान्सून अपडेटkonkanकोकणRainपाऊसweatherहवामानMumbaiमुंबई