मुंबई : मान्सूनने अखेर बुधवारी परतीच्या प्रवासाला सुरुवात केली आहे. राजस्थान, पंजाब आणि हरयाणा राज्याच्या काही भागातून मान्सूनने आपल्या परतीचा प्रवास सुरू केल्याची घोषणा भारतीय हवामान शास्त्र विभागाने केली आहे. सर्वसाधारणपणे १ सप्टेंबर रोजी मान्सून परतीच्या प्रवासाला सुरुवात करतो आणि १ आॅक्टोबर रोजी महाराष्ट्रातून माघारी फिरतो. मात्र या वेळी मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला तब्बल एक महिना विलंब झाला आहे. सर्वसाधारण अंदाजाप्रमाणे ९ नोव्हेंबरपर्यंत तो महाराष्ट्रातून माघार घेईल. म्हणजेच तब्बल आणखी एक महिना पावसाचा तडाखा बसणार आहे.मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला बुधवारी म्हणजे ९ आॅक्टोबर रोजी सुरुवात झाली. राजस्थानसह पंजाब आणि हरयाणाच्या काही भागातून मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू झाला. या परतीच्या प्रवासासाठी हवामान अनुकूल आहे. जून, जुलै, आॅगस्ट आणि सप्टेंबर या चार महिन्यांत मान्सूनने देशासह महाराष्ट्र आणि मुंबईला चांगलेच झोडपून काढले. देशभरात चार महिन्यांत तब्बल ११० टक्के पावसाची नोंद झाली असून, महाराष्ट्रात ३२ टक्के अधिकचा पाऊस नोंदविण्यात आला. महत्त्वाचे म्हणजे मान्सूनचा हंगाम संपल्यानंतरही देशासह राज्यभरात ठिकठिकाणी पावसाचा मारा कायम होता. दक्षिण भारताच्या तुलनेत उत्तर भारतात याच काळात पाऊस चांगला झाला. आता त्याचा परतीचा प्रवास सुरू झाला असला तरी तो महाराष्ट्रातून माघार घेण्यास महिना जाईल.हवामान अनुकूलमान्सूनच्या परतीच्या प्रवासास हवामान अनुकूल असून, येत्या काळात मान्सून उत्तर भारतातून म्हणजे दिल्ली, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशमधूनही माघार घेईल. हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, छत्तीसगडमधूनही तो आॅक्टोबरच्या तिसऱ्या आठवड्यात माघार घेण्याची शक्यता आहे. याच काळात पूर्व भारतातूनही मान्सून माघार घेण्याची शक्यता भारतीय हवामान शास्त्र विभागाने वर्तविली आहे.दुहेरी वातावरणाने मुंबईकर त्रस्त; कमाल तापमान ३५ अंशमान्सूनच्या परतीच्या प्रवासास हवामान अनुकूल असून, येत्या काळात मान्सून उत्तर भारतातून म्हणजे दिल्ली, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशमधूनही माघार घेईल. हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, छत्तीसगडमधूनही तो आॅक्टोबरच्या तिसºया आठवड्यात माघार घेण्याची शक्यता आहे. याच काळात पूर्व भारतातूनही मान्सून माघार घेण्याची शक्यता भारतीय हवामान शास्त्र विभागाने वर्तविली आहे.मुंबईचे कमाल तापमान ३५ अंशमान्सूनच्या परतीचा प्रवास बुधवारी राजस्थानातून सुरू झाला असतानाच दुसरीकडे मुंबई शहर आणि उपनगरासह राज्याला पावसाने झोडपून काढले आहे. मंगळवारी रात्री मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईत जोरदार पाऊस पडला. त्यानंतर दुसºया दिवशी म्हणजे बुधवारी मात्र येथे कडाक्याचे ऊन पडले होते. मुंबई व उपनगरातील ठिकठिकाणचे कमाल तापमान ३५ अंशाच्या आसपास नोंदविण्यात येत आहे.भारतीय हवामान शास्त्र विभागाच्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला. कोकण, गोव्यात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची नोंद झाली. १० आॅक्टोबर रोजी मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल. कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह पाऊस पडेल.मुंबईत दोन दिवस आकाश राहणार ढगाळ११ आॅक्टोबर रोजी कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडेल. १२ आॅक्टोबर रोजी मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह पाऊस पडेल. मुंबईचा विचार करता येथे गुरुवारसह शुक्रवारी शहर आणि उपनगरात आकाश अंशत: ढगाळ राहील. हलक्या स्वरूपाचा पाऊस पडेल.
दिवाळी संपेपर्यंत मुंबईत बरसणार पाऊस; हवामान शास्त्र विभागाची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2019 5:32 AM