मुंबई : सलग चौथ्या दिवशीही मुंबई शहर आणि उपनगराला मुसळधार पावसाने झोडपून काढले. शहरासह उपनगरातील सखल भागांत पावसाचे पाणी साचल्याने सकाळच्या प्रहरीच धावत्या मुंबापुरीला ब्रेक लागला. हार्बर, मध्य आणि पश्चिम रेल्वेमार्गासह रस्ते वाहतुकीवरही मुसळधार पावसाचा विपरीत परिणाम झाल्याने दुपार्पयत मुंबईचा वेग संथ होता.
शुक्रवारी सकाळपासूनच शहर, पूर्व आणि पश्चिम उपनगराला मुसळधार पावसाने झोडपून काढले. परिणामी चिंचपोकळी येथील सरदार हॉटेल, दादर येथील हिंदमाता, कुर्ला पश्चिमेकडील शीतल सिग्नल आणि कमानी सिग्नल, अंधेरी येथील डी.एन. नगर, माटुंगा येथील गांधी मार्केट, वांद्रे येथील एस.व्ही. रोड, दादर टीटी, अंधेरी सब-वे, जेव्हीएसएलआर आणि लोअर परळ येथील सखल भागांत गुडघ्याएवढे पावसाचे पाणी साचले होते. शिवाय वांद्रे येथील एस.व्ही. रोड, सांताक्रुझ, लीलावती जंक्शन, पश्चिम द्रुतगती महामार्ग, वांद्रे सी-लिंकवरील वांद्रे रोड, एलबीएस मार्गावरील कुर्ला डेपो ते घाटकोपर पश्चिमेकडील सवरेदयर्पयतची रस्ते वाहतूक धीम्या गतीने सुरू होती.
दरम्यान, दुपारी काही काळ पावसाने विश्रंती घेतली. मात्र सायंकाळी त्याने पुन्हा जोरदार वर्षाव सुरू केल्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग आणि एलबीएस मार्गावरील वाहतूक धीम्या गतीने सुरू असल्याचे पालिका नियंत्रण कक्षातून सांगण्यात आले. (प्रतिनिधी)
मध्य रेल्वेच्या 38 लोकल रद्द
च् मुसळधार पावसाने शुक्रवारी रेल्वेला चांगलेच झोडपले. त्यामुळे पश्चिम आणि मध्य रेल्वेच्या सेवेचा बो:या वाजण्याबरोबरच प्रवाशांचे हाल झाले. लोकलच्या अनेक फे:या रद्दही केल्या.
च्पावसामुळे कुर्ला, चेंबूर आणि मानखुर्द स्थानकांतील रुळांवर पाणी साचल्याने हार्बर सेवेला पहिला फटका बसण्यास सुरुवात झाली. सकाळी 11 ते सायंकाळी चार वाजेर्पयत हार्बरचा बो:या वाजला. तर विक्रोळी, मुलुंड आणि कुल्र्याजवळील रुळांवर साचलेल्या पाण्यामुळे मध्य रेल्वेच्या मेन लाइनलाही फटका बसला. यामुळे 38 लोकल रद्द केल्या. तर 5 लोकल मधल्या स्थानकांर्पयत सोडून त्या रद्द केल्या.
च्एलफिन्स्टन स्थानकात साचलेल्या पाण्यामुळे पश्चिम रेल्वेच्या लोकलचा वेग आपोआप मंदावला. यामुळे या मार्गावरील लोकल वीस मिनिटे उशिराने धावत होत्या.
पुन्हा भिंतीचा भाग कोसळला
च्सॅन्डहस्र्ट रोड स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक एकच्या बाजूलाच भिंत आहे. गुरुवारी सकाळी या भिंतीचा काहीसा भाग कोसळलेला असतानाच पुन्हा एकदा याच भिंतीचा मोठा भाग कोसळला. शुक्रवारी दुपारी 12.50 च्या सुमारास हा भाग कोसळल्यानंतर लोकल सेवेवर त्याचा परिणाम झाला.
च्रुळावर दगड आणि माती आल्याने ते काढण्याचे काम हाती घेण्यात आले. तसेच या आणखी भाग कोसळू नये म्हणून त्याला प्लॅस्टिकने झाकण्यात आले. या भिंतीच्या डागडुजीचे काम हाती घेण्यात येणार आहे.
च्पावसामुळे विमानसेवेवरही परिणाम झाला. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय विमाने पंधरा ते वीस मिनिटे उशिराने धावत असल्याचे जीव्हीकेच्या प्रवक्त्याकडून सांगण्यात आले. पण एकही सेवा रद्द करण्यात आली नाही.
च्मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र वगळता मुंबईसह कोकण व पश्चिम महाराष्ट्रात शुक्रवारी पावसाने जोरदार हजेरी लावली़ येत्या अठ्ठेचाळीस तासांत कोकण व विदर्भात चांगला पावसाची शक्यता वर्तविण्यात आली असून, पुणो परिसरात मात्र पावसाच्या हलक्या सरी पडतील, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.