पुणे : श्री गणरायाच्या आगमनापासून राज्यात सुरू झालेल्या पावसाचा जोर कायम आहे. सोमवारी सर्वदूर मुसळधार पाऊस झाला. कोकणात अनेक ठिकाणी तसेच मराठवाड्यात बीड जिल्ह्यात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. येत्या गुरुवार (३१ आॅगस्ट) पर्यंत पावसाचा जोर कायम राहील, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे.कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात बहुतांश ठिकाणी तर विदर्भात बºयाच ठिकाणी पाऊस पडला़ मराठवाडाही पावसाने चिंब झाला आहे. बीड जिल्ह्यात पाच मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. नेकनूर, आष्टी, अंबाजोगाई तालुक्यात जोरदार पाऊस झाल्याने डोकेवाडा, बिंदूसरा मध्यम प्रकल्प भरले आहेत. डोकेवाडा, कर्जनी तलाव, ब्रह्मगाव तलावही भरले आहेत. बिंदूसरा नदीला पूर आल्यामुळे बीड शहरातील नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तसेच सोलापूर-धुळे राष्टÑीय महामार्गावरील पर्यायी पूल वाहून गेल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. शहरातून वाहतूक वळविल्याने कोंडी होत आहे. जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस पडत असल्याने धरणात १२४१३ क्युसेक्स क्षमतेने आवक सुरू असून धरणाचा जलसाठा सोमवारी रात्री ७ वाजता ६६.८२ टक्के एवढा झाला होता.उत्तर महाराष्ट्रात नाशकात मुसळधार पाऊस झाला. गंगापूर धरणाच्या लाभक्षेत्रात पावसाचा जोर वाढल्याने गोदावरीला पूर आला आहे. धरणातून रात्री सात हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात आला. खान्देशातही अनेक ठिकाणी चांगला पाऊस झाला. विदर्भातही अनेक ठिकाणी पाऊस झाला. वर्धा जिल्ह्यातील बोरगाव गोंडी येथील शेतकरी विठ्ठल अमृतराव गुबरे (४५) हे अंगावर वीज पडल्याने जखमी झाले.सोमवारी दिवसभरात अलिबाग ७०, रत्नागिरी ३५, डहाणू २४, पुणे ४, महाबळेश्वर ५१, मालेगाव ६, नाशिक ६, सांगली ०़५, सातारा १, सोलापूर ७, उस्मानाबाद १, परभणी २, अमरावती ११, गोंदिया ९, वर्धा २, यवतमाळ ३ मिमी पावसाची नोंद झाली आहे़नाशिक जिल्ह्यात वरुणराजाची कृपादृष्टीनाशिक : विश्रांतीनंतर गणेश चतुर्थीपासून वरुणराजाने पुन्हा जिल्ह्णावर कृपादृष्टी केली आहे. शुक्रवारपासून सातत्याने जोरदार पाऊस जिल्ह्णाच्या काही तालुक्यांमध्ये सुरू असल्यामुळे धरणांमधून पून्हा विसर्ग वाढविण्यात आला आहे. पालखेड धरण समूहातील डझनभर धरणांचा साठा ८०च्या पुढे सरकला आहे.शहरात संततधारेसह ग्रामीण भागात जोरदार पाऊस सुरू असल्यामुळे जिल्ह्णातील बहुतांश धरणांचा जलसाठा वाढला आहे. गंगापूर धरण समूहातील सर्व धरणे जवळपास पूर्ण भरली असून विसर्ग सातत्याने सुरू आहे. गंगापूर धरणाचा जलसाठा ९४ टक्क्यांवर पोहोचला आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा पावसाचा जोर अधिक असल्यामुळे जिल्ह्णातील धरणांमधील पाण्याची पातळी वाढली आहे. गोदावरी खोºयावरील गंगापूर धरण समूहात कश्यपी, गौतमी, आळंदी हे तीन मध्यम प्रकल्पाअंतर्गत धरणातही चांगला पाऊस झाला आहे.पालखेड धरण समूहाची स्थितीही यंदा उत्तम आहे. कादवा नदीवरील पालखेड धरण ७३ टक्के, करंजवण ९९ टक्के, तर कोळवण नदीवरील वाघाड १०० टक्के भरले आहे. उनंदा नदीवरील ओझरखेड १०० टक्के, पुणेगाव ९३ टक्के आणि तीसगाव धरण १०० टक्के भरले आहे. दारणा धरणात ७ हजार ११९ दलघफू इतका जलसाठा असून, धरण १०० टक्के भरले आहे. भावली धरण हे मध्यम स्वरूपाचे असून, १ हजार ४३४ दलघफू जलसाठाझाला.२९ आॅगस्ट : येत्या २४ तासात उत्तर कोकणात काही ठिकाणी जोरदार व तुरळक ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता असून दक्षिण कोकण, गोवा व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार तर मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता़३० आणि ३१आॅगस्ट : कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता
राज्यात पावसाचा जोर कायम!, बिंदूसरा, गोदावरी नदीला पूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2017 5:12 AM