पुणे : अरबी समुद्राच्या किनारपट्टीवर आणि मध्य प्रदेश व राजस्थान या राज्यांवर हवेचे कमी दाबाचे नवे क्षेत्र निर्माण झाल्याने राज्यात पावसाचे प्रमाण आणखी वाढणार आहे, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे. पुढील ४८ तासांत कोकण आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहेगेल्या २४ तासांत सावंतवाडी, नवापूर येथे १६० मिलिमीटर, कणकवली, माथेरान, पेण, शहापूर, महाबळेश्वर, वर्धा, सेलू येथे ९०, सुरगाणा, मौदा येथे ८०, कर्जत, खालापूर, शहादा येथे ७०, पोलादपूर, यवतमाळ, बाभूळगाव येथे ६०, चिपळूण, पनवेल, पाली, वेंगुर्ला, भंडारा, धामणगाव येथे ५०, पालघर, रोहा, संगमेश्वर, दिंडोरी, गगनबावडा, शिरपूर, आर्वी, भिवापूर येथे ४०, अंबरनाथ, महाड, मुंबई, ठाणे, उल्हासनगर, साक्री, सिंदखेडा, आष्टी, गोंदिया, नागपूर, रामटेक येथे ३०, दापोली, कल्याण, मालवण, मुरूड, अकोले, ओझर, पाटण, शाहूवाडी, अकोला, चिखलदरा, हिंगणा, खामगाव येथे २०, अलिबाग, डहाणू, गुहाघर, हर्णे, जळगाव, पन्हाळा, राधानगरी, शिराळा, सिन्नर, अमरावती येथे १० मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली. (प्रतिनिधी)
राज्यात पावसाचे प्रमाण वाढणार
By admin | Published: July 26, 2015 2:42 AM