पुणे : कोकण व परिसरात निर्माण झालेल्या द्रोणीय परिस्थितीमुळे राज्यात सर्वत्र ढगाळ वातावरण निर्माण झाले असून शनिवार, रविवारी विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे़ १२ फेब्रुवारीला मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात गारांचा पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे़
कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडला़ कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली आहे़ गेल्या दोन दिवसांपासून निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यातील जवळपास सर्व ठिकाणच्या कमाल व किमान तापमानात वाढ झाली आहे़
१० फेब्रुवारीला विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे़ ११ फेबु्रवारी मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे़ १२ फेब्रुवारीला विदर्भात बºयाच ठिकाणी, मराठवाड्यात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे़
११ फेब्रुवारी : विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह गारांचा पाऊस पडण्याची शक्यता़
१२ फेब्रुवारी : मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदभाृत तुरळक ठिकाणी गारपिट होण्याची शक्यता़