शहरं
Join us  
Trending Stories
1
Exit Poll: महाराष्ट्रात १० पैकी ६ एक्झिट पोल महायुतीच्या बाजुने; एकाने तर कोणालाच बहुमत दिले नाही
2
Maharashtra Exit Poll 2024: खरी शिवसेना कुणाची...? एकनाथ शिंदे की...? Exit Poll मध्ये उद्धव ठाकरेंना दुहेरी धक्का!
3
राज ठाकरे किंगमेकर ठरणार का? मनसेला किती जागा मिळणार? Exit Poll ची धक्कादायक आकडेवारी
4
Exit Poll of Maharashtra: एक्झिट पोलमध्ये ठाकरेंपेक्षा शरद पवार, काँग्रेस सर्वात मोठ्या फायद्यात...; भाजपा सर्वात मोठा पक्ष
5
मुंबईत धक्कादायक निकालाची शक्यता; एक्झिट पोलनुसार महायुती आणि मविआला समान जागा
6
झारखंडमध्ये इंडिया आघाडीला मोठा धक्का; Exit Poll मध्ये NDA ला स्पष्ट बहुमताचा अंदाज
7
Maharashtra Election Exit Poll : राज्यात मविआचं सरकार येणार...! भाजप सर्वात मोठा पक्ष ठरणार; जाणून घ्या कुणाला किती जागा मिळणार?
8
विदर्भात भाजपचं मोठं कमबॅक; महायुतीला ३७ जागा मिळण्याचा अंदाज
9
महाराष्ट्रात पुन्हा महायुती सरकार ; Matrize एक्झिट पोलमध्ये 150-170 जागा मिळण्याचा अंदाज
10
Maharashtra Election Exit Poll Results 2024 : महाराष्ट्राचा एक्झिट पोल येण्यास सुरुवात; मॅट्रिझ, चाणक्यचा महायुतीचा अंदाज, तर...
11
Exit Poll: भाजपा सर्वांत मोठा पक्ष ठरणार, महायुतीचे सरकार येणार, मविआला किती जागा मिळणार?
12
परभणीतील मतदान केंद्रावर सहा वाजेनंतर शेकडो मतदार रांगेत; प्रक्रिया सुरूच राहणार
13
Exit Poll Of Maharashtra:२०१९ मध्ये एक्झिट पोलचे काय होते अंदाज? मतदानाच्या तारखांत केवळ एका दिवसाचा फरक, पण...
14
महाराष्ट्र साठचा आकडा पार करणार; सायंकाळी ५ वाजेपर्यंत एवढे मतदान, अजून एक तास बाकी
15
IND vs AUS: शुबमन गिल संघात केव्हा परतणार? बॉलिंग कोच मॉर्कलने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
16
Fact Check: मुख्यमंत्र्यांचा फेक व्हिडिओ व्हायरल;  'लोकमत'चं नाव आणि लोगो वापरून मतदारांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न
17
“माझा मुलगा युद्धात लढून जिंकेल याचा अभिमान, अमितचा मोठा विजय हवा आहे”: शर्मिला ठाकरे
18
रोहित नसताना जसप्रीत बुमराहच कर्णधार! मॉर्कलच्या प्रेस कॉन्फरन्समुळे चर्चांना पूर्णविराम
19
Video - "मीरापूरमध्ये रिव्हॉल्व्हर दाखवून SHO ने मतदारांना धमकावलं"; अखिलेश यादवांचा आरोप
20
पाकिस्तानमध्ये आणखी एक दहशतवादी हल्ला; चौकी उडविली, १७ सैनिकांचा मृत्यू

१ ऑगस्टपासून पावसाचा जोर वाढणार; मुंबई, ठाणे, नवी मुंबईत कोसळधारा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2020 5:43 AM

सोमवारी मुंबईत १००.७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती, तर दुसऱ्या दिवशी म्हणजे मंगळवारी सकाळी ८ वाजता सरासरी ६० मिमी पावसाची नोंद झाली.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : सोमवारी मुंबईत १००.७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती, तर दुसऱ्या दिवशी म्हणजे मंगळवारी सकाळी ८ वाजता सरासरी ६० मिमी पावसाची नोंद झाली. १ आॅगस्टपासून कोकणात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता असून, मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई येथेही पावसाचा जोर वाढेल, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे.हवामान खात्याच्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत मुंबई व परिसरात काही ठिकाणी जोरदार पाऊस पडला.काही ठिकाणी आकाश ढगाळ होते. पुढच्या २४ ते ४८ तासांत मुंबई आणि ठाण्यात, तर पुढच्या ४८ तासांत मराठवाडा व लगतच्या परिसरात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे.

पावसाची नोंद(मिमीमध्ये)कुलाबा -५७.२सांताक्रुझ -२८.६शहर-२७.४१पूर्व उपनगर -३७.१८पश्चिम उपनगर ३५.९८

च्दुपारी साडेबारा वाजल्यानंतर मुंबईत पुन्हा पावसाची रिमझिम सुरू झाली. या काळात ७ ठिकाणी झाडे पडली. एका ठिकाणी शॉर्ट सर्किट झाले. सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही. दुपारी ४ नंतर पावसाचा जोर पुन्हा वाढला.च्आता पुढच्या २४ ते ४८ तासांत मुंबई, ठाण्यात, नवी मुंबईत जोरदार पाऊस पडणार आहे.च्सकाळी ८ ते १० या वेळेत शहर आणि उपनगरात अनेक ठिकाणी १० ते १५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. सकाळी १० नंतर त्याने थोडी विश्रांती घेतली. बहुतांश ठिकाणी हवामान ढगाळ होते. मात्र पाऊस बेपत्ता होता. त्यामुळे मंदावलेल्या वाहतुकीने पुन्हा वेग धरला.

रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये मुसळधार बरसणाररत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये येत्या ५ दिवसांत मुसळधार पाऊस पडेल. तर, मुंबईत पुढील २४ तासांत मेघगर्जनेसह मुसळधार पावसाची शक्यता आहे. मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगडमध्ये पावसाचा जोर कायम राहील.- शुभांगी भुते, शास्त्रज्ञ, मुंबई प्रादेशिक हवामान शास्त्र विभाग.

टॅग्स :Rainपाऊस