पुणे : दोन दिवसांपासून राज्यासह कोकणात पावसाचे धूमशान सुरूच असून मध्य महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर अतिवृष्टी झाली आहे़ कोकण व विदर्भात काही ठिकाणी जोरदार पाऊस झाला़ गडचिरोली जिल्ह्यात भामरागड तालुक्यात पुराचे पाणी शिरल्याने ७० गावांचा संपर्क तुटला आहे.मराठवाड्यात पावसाचा जोर कमी झाला आहे. जोरदार पावसामुळे मध्य महाराष्ट्रातील अनेक धरणे भरत असली आहेत़ सोलापूर सूर्यदर्शनही होत नसल्याने खरीप पिके पिवळी पडू लागली आहेत.७० गावांचा संपर्क तुटलागडचिरोली : पर्लकोटा नदीच्या पुराचे पाणी भामरागडात शिरले आहे. पुलावरून पाणी वाहत असल्याने छत्तीसगड सीमेकडील भामरागड तालुक्यातील जवळपास ७० गावांचा शनिवारपासून संपर्क तुटला आहे. पर्लकोटा, पामुलगौतम व इंद्रावती नद्यांची पाणीपातळी वाढली आहे.दक्षिण महाराष्टÑात संततधारकोल्हापूर : कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यात दोन दिवस संततधार पाऊस सुरू आहे. धरणांतील पाण्याची पातळी वाढल्याने राधानगरी धरणाचे चार स्वयंचलित दरवाजे तर कोयना धरणाचे सहा वक्राकार दरवाजे सहा फुटांनी उचलले आहेत.>विदर्भातील ९ जिल्ह्यांत पाऊस कमीचविदर्भातील ९ जिल्ह्यांमध्ये अजूनही पाऊस सरासरीपेक्षा कमी आहे़ संपूर्ण विदर्भाचा विचार केल्यास आतापर्यंत सरासरीपेक्षा ९ टक्के पाऊस कमी पाऊस झाला आहे़ यवतमाळ -२४, अकोला -२७, गोंदिया - २१, अमरावती -१९, गडचिरोली - १०, भंडारा -९, चंद्रपूर -८, वर्धा - ५ टक्के कमी पाऊस झाला आहे़ त्याचवेळी बुलढाणा येथे सरासरीच्या तुलनेत १२, नागपूर १० टक्के जादा पाऊस झाला आहे़ मराठवाड्यात यंदा प्रथमच सरासरीपेक्षा33%अधिक पाऊस झाला आहे. राज्यातील ७ जिल्ह्यांत सरासरीपेक्षा खूप अधिक पाऊस झाला आहे़ अहमदनगरमध्ये सरासरीच्या दुप्पटीहून अधिक १०६ टक्के पाऊस झाला आहे़मध्य महाराष्ट्रातील नंदुरबार -३ आणि मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यात सरासरीपेक्षा १ टक्का कमी पाऊस झाला आहे़सर्वाधिक पाऊस झालेले जिल्हे (टक्केवारी) : अहमदनगर १०६, औरंगाबाद ९२, सोलापूर ७२, बीड ६९, मुंबई शहर ६६, मुंबई उपनगर ६४, धुळे ६०>भंडारदरा धरण ओव्हरफ्लोअहमदनगर : भंडारदरा धरणातील पाणीसाठा रविवारी सकाळी सहा वाजता १० हजार ३३६ दशलक्ष घनफूट झाला होता. यावेळी तांत्रिकदृष्ट्या भंडारदरा धरण भरल्याचे जाहीर करण्यात आले. यानंतर धरणातून एकूण ३ हजार २६८ क्युसेकने प्रवरा नदीपात्रातपाणी सोडण्यात आले.>पावसाचा इशारा : मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यातील घाटमाथ्यावरील तुरळक ठिकाणी पुढील ४ दिवस मुसळधार पावसाची शक्यता असून पुणे व सातारा जिल्ह्यातील घाट परिसरात १७ आॅगस्टला अतिवृष्टी होण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे़ कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात पुढील ४ दिवस मुसळधार पावसाची शक्यता आहे़
कोकणात पावसाचे धूमशान सुरूच, मराठवाड्यात जोर कमी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2020 2:46 AM