शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
6
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
7
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
8
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
9
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
10
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
11
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
12
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
13
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
14
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
15
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
16
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
17
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
18
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
19
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
20
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."

पावसाचा जोर ओसरला

By admin | Published: October 04, 2016 4:17 AM

एखादा अपवाद वगळता मराठवाड्यात पावसाने सोमवारी विश्रांती घेतली. नदी, नाल्यांना आलेला पूर ओसरत असून जनजीवनही पूर्वपदावर येत असले तरी पिकांसह मालमत्तेचे अतोनात नुकसान झाले आहे.

औरंगाबाद/पुणे: एखादा अपवाद वगळता मराठवाड्यात पावसाने सोमवारी विश्रांती घेतली. नदी, नाल्यांना आलेला पूर ओसरत असून जनजीवनही पूर्वपदावर येत असले तरी पिकांसह मालमत्तेचे अतोनात नुकसान झाले आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील मांजरा, तेरणा, बोरी या प्रमुख नद्यांसह इतर ओढे-नद्यांना पूर आला आहे़ या पावसामुळे लाखो एकरावरील खरिप पिकांचे नुकसान झाले असून, शेकडो घरांची पडझड झाली आहे़ आजवर जिल्ह्यात १०६़४७ मिमी पावसाची नोंद झाली. येथील १३३ प्रकल्प तुडुंब भरले असून, ५ प्रकल्प भरण्याच्या मार्गावर आहेत़

लातूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले आहे. रेणापूर, जळकोट, उदगीर आणि चाकूर तालुक्यांत सर्वाधिक नुकसान झाले असून, एनडीआरएफच्या पथकाचे मदतकार्य अद्यापही सुरूच आहे. पुरात अडकलेल्या ७२ जणांचे प्राण वाचविण्यात या पथकाला यश आले असून, रविवारपासून पावसाने विश्रांती घेतली आहे. जळकोट तालुक्यातील नऊपैकी सहा गावांचा वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला आहे. मांजरा, तावरजा प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग करण्यात आला असल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

बीड जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. नद्यांना पूर आल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला होता. सोमवारपर्यंत वार्षिक सरासरीच्या तुलनेत जिल्ह्यात १२२.३५ टक्के पाऊस झाला. शनिवार व रविवारी मुसळधार पावसाने हजेरी लावली. यामुळे बीड तालुक्यातील हिंगणी (खुर्द) या गावात मांजरा नदीचे पाणी घुसल्याने २०० नागरिकांचे स्थलांतर करावे लागले. सोमवारी गावातील पाणी ओसरल्याचे नागरिकांनी सांगितले. परळी तालुक्यातील संगम या गावचा तीन दिवसांपासून संपर्क तुटला होता. सोमवारी येथील जनजीवन सुरळीत झाले. नांदेड, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातही पावसाने विश्रांती घेतल्यामुळे पुराचे पाणी ओसरत आहे. जळगाव-नंदुरबारमध्येही मुसळधारजळगाव जिल्ह्यातील काही भागात दमदार पाऊस झाला. तोंडापूर धरणातून पाणी सोडण्यात आले असून तितूर, गडद नदीला पूर आला आहे. चाळीसगावमधील मन्याड धरण १०० टक्के भरले आहे. नंदुरबार जिल्ह्यातही अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला.शारदीय नवरात्रौत्सवातील सोमवारी तिसऱ्या माळेला मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. येत्या दोन दिवसांत उत्तर कोकणात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने व्यक्त केली आहे़