पुणो : मुठा खो:यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रत आज पावसाने विश्रंती घेतली. खडकवासला प्रकल्पांतर्गत येणा:या पानशेत, वरसगाव, टेमघर आणि खडकवासला या चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रत आज दिवसभरात अवघा 61 मिलिमीटर पावसाची नोंद झाली.
शहराबरोबरच पाणीपुरवठा करणा:या धरणांच्या पाणलोट क्षेत्रतही आज पावसाने विश्रंती घेतली. आज सकाळी
आठ ते सायंकाळी पाच या कालावधीत सर्वाधिक 27 मिलिमीटर पावसाची नोंद टेमघर धरणाच्या पाणलोट क्षेत्रत झाली. तर,
पानशेत आणि वरसगाव धरणांच्या पाणलोट क्षेत्रत 14 मिलिमीटर पाऊस झाला. तर, खडकवासला धरणात अवघा 6 मिलिमीटर पाऊस झाल्याची माहिती पाटबंधारे विभागाकडून देण्यात आली. खडकवासला धरण अद्यापही 9क् टक्क्यावर भरले असल्याने धरणातून मुठा नदीत
3352 क्युसेक्स, तर कालव्याच्या माध्यमातून 1277 क्युसेक्स
पाणी सोडण्यात येत आहे.
तर, टेमघरमध्येही साठा वेगाने
वाढत असल्याने या धरणातून काही दिवसांत विसर्ग सुरू करण्याची शक्यता असल्याचे पाटबंधारे विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)
खडकवासला, पानशेत, वरसगाव, टेमघर या चारही धरणांचा उपयुक्त पाण्याचा प्रकल्पीय साठा 24.क्7 टीएमसी (83 टक्के) झाला आहे. पानशेत आणि वरसगाव धरणांचा पाणीसाठाही 8क् टक्क्यांच्या वर पोहोचला आहे. खडकवासला धरणात 92 टक्के पाणी असून, टेमघर धरणाचा पाणीसाठा 87 टक्क्यांवर पोहोचला आहे.
धरणाचेपाऊसपाणीसाठाउपयुक्त पाणीसाठा
नाव(मिमी)(टीएमसी)क्षमता ( टीएमसी)
खडकवासला61.801.97
पानशेत 14 8.84 10.65
वरसगाव 14 10.20 12.85
टेमघर 27 3.23 3.61
एकूण 6124.04 29.05