हडपसर : काळेपडळ येथील प्रगती नगर गल्ली नं. ५ येथे निकृष्ट दर्जाच्या पेव्हर ब्लॉक बसवल्याची तक्रार येथील नागरिक करीत आहेत. हे ब्लॉक बसवल्यामुळे घरच्या उंबऱ्यापेक्षा रस्त्याची उंची जास्त झाली आहे. त्यामुळे रात्री झालेल्या पावसात पाणी साचले. पावसाळ्यात अशीच परिस्थिती राहिली तर नागरिकांना त्रासदायक ठरणार आहे.निकृष्ट दर्जाच्या पेव्हर ब्लॉकचे काम व त्यामुळे पुढे रस्ते आणि फुटपाथची अवस्था, चुकीच्या पद्धतीने केलेल्या कामामुळे भविष्यात पाणी घरात शिरण्याच्या शक्यतेने नागरिकांमध्ये कमालीची चिंता होती आणि ती कालच्या मुसळधार पावसाने वाढली. परिसरातील नागरिकांनी यास विरोध दर्शविला असता कंत्राटदाराने तक्रारीकडे दुर्लक्ष केले होते. कामाची अवस्था पाहून कामाच्या दर्जाविषयी नागरिकांमध्ये नाराजी आहे. काम करताना दर्जा राखला न गेल्याने पावसाळ्यात पाणी साचून ते उखडले जातील. परिणामी गल्लोगल्ली खड्डे होऊन रस्ते अपघातग्रस्त होतील, अशी नागरिकांची तक्रार आहे.
पेव्हर ब्लॉकमुळे पावसाचे पाणी घरात
By admin | Published: June 09, 2017 12:50 AM