शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या ₹1500 चे लवकरच ₹2100 होणार, मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा!
3
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
4
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
5
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
6
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरल्या होत्या 363 महिला, किती जिंकल्या? असा राहिला महायुतीचा स्ट्राइक रेट
7
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
8
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
9
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
10
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
11
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
12
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
13
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
14
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
15
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
16
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
17
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
18
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
19
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान

मुंबईजवळचे पावसाळी पिकनिक पॉईंट्स

By admin | Published: June 27, 2016 11:29 AM

उन्हाच्या रणरणत्या तडाख्यातून दिलासा देण्यासाठी मान्सूनचे आगमन झाले असून वातावरणातील गारव्यामुळे सर्वजण सुखावले आहेत.

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. २७ -  उन्हाच्या रणरणत्या तडाख्यातून दिलासा देण्यासाठी मान्सूनचे आगमन झाले असून वातावरणातील गारव्यामुळे सर्वजण सुखावले आहेत. अशा या चिंब पावसात भिजण्यासाठी लहानथोर सर्वजण नेहमीच तयार असतात. पावसाळी वातावरणात मित्र-मैत्रिणी वा कुटुंबियासह ट्रेक व पिकनिकला जाऊन पावसाळ्याचा आनंद लुटणं कोणाला नाही आवडणार? मुंबईतील अशाच काही ठिकाणांची माहिती तुमच्यासाठी...
 
1) कोंडेश्वर धबधबा-  बदलापूर
मध्य रेल्वेच्या बदलापूर स्थानकापासून पूर्वेला साधारण १५ किलोमीटर अंतरावर असलेला हा धबधबा अतिशय लोकप्रिय पिकनिक पॉईंट आहे. तिथे शंकर व गणपतीचे मंदिरही असून शंकराच्या मंदिरामुळचे त्या धबधब्याला कोंडेश्वर हे नाव पडल आहे. पंधरा फुटांवरून अधिक उंचीवरून कोसळणा-या या धबधब्याखाली भिजण्याची मजा लुटण्यासाठी फक्त स्थानिकच नव्हे तर मुंबई व बाहेरूनही अनेक पर्यटक येत असतात.
कसे जाल : तेथे जाण्यासाठी तुमची स्वत:ची गाडी असेल तर उत्तमच अन्यथा बदलापूरला उतरून टमटमही मिळू शकते.
 
2) माळशेज घाट-  कल्याण-मुरबाड मार्ग
मुंबईतील ट्रेकर्स व पिकनकिसाठी जाणा-या तरूणांमध्ये अतिशय प्रसिद्ध असलेला हा माळशेज घाट पावसाळ्यात हिरवाईने अक्षरश: नटलेला असतो.  या घाटातील मनोरम दृश्यं, कड्यांवरून कोसळणारा पाऊस आणि तेथील धबधबे यामुळे पर्यटकांची इथे खूप गर्दी असते. तसेच पावसाळ्यात येथील जलाशयात येणारे फ्लेमिंगो पक्षी पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी जमते. तसेच घाटाच्या पायथ्याशी अनके चांगली रिसोर्ट्स असून उत्तम जेवण मिळते.
 
3) पळस दरी - 
मध्य रेल्वेच्या खोपोली रेल्वे स्थानकापासून काही अंतरावर असलेले हे गाव पावसाळी पिकनिकसाठी एक उत्तम ठिकाण असून पर्यटकांचा आवडता स्पॉट आहे. येथून वाहणारे पांढरे शुभ्र धबधबे, डोंगरांवर पसरलेली हिरवाईची झालर, जवळच असलेला सोनगिरी किल्ला यामुळे हा स्पॉट पिकनिक व ट्रेकर्ससाठी एकदम चर्चेत असतो. 
 
४) कान्हेरी - बोरीवली
मुंबईसारख्या गजबजलेल्या शहरातही काही निवांत ठिकाणे असून उपनगरातील आवडता पावसाळी पिकनिक स्पॉट म्हणजे कान्हेरी.  संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील कान्हेरी लेणी परिसरात अनेक धबधबे असून कॉलेज तरुणांचे सर्वात आवडते ठिकाण आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या गेटवरून कान्हेरी गुंफेकडे जाण्यासाठी अनेक बस उबलब्ध आहेत. 
 
 
५) भिवपुरी धबधबा- भिवपुरी
मध्य रेल्वेच्या भिवपुरी स्थानकाहून शेतातून जाणारी पाउलवाट अवघ्या अर्ध्या तासात भिवपुरी धबधब्याकडे नेते. माथेरानच्या पठारावरून येणारं हे पाणी धबधब्याच्या रुपाने खाली येतं आणि त्याचमुळे हा धबधबा सेफ असून वीकेंड्सना येथे पर्यटकांची मोठी गर्दी दिसते. स्थानकाजवळ काही हॉटेल्स असून तेथे चांगले जेवळ मिळते.
 
 
६)  माथेरान -
भर पावसात माथेरानला जाऊन भिजण्याची मजा काही औरच. नेरळ स्टेशनला उतरून मिनी ट्रेनद्वारे माथेरानला जाताना खूप मजा येते. तसेच नेरळ ते माथेरान या ट्रेनप्रवासादरम्यान अनेक धबधबेही लागतात. अनेक पर्यटक तेथे उतरून धबधब्यांखाली मनसोक्त भिजण्याचा आनंद घेतात. 
 
७)  तुंगारेश्वर -  मुंबई-अहमदाबाद हायवेलगत, वसई.
मुंबईपासून सुमारे २ तासांच्या अंतरावर असलेले हे ठिकाण धार्मिकही आहे आणि एक प्रसिद्ध पिकनिक स्पॉट. वसईजवळील हा प्रसिद्ध धबधबा असून तेथे प्रसिद्ध शिवमंदिरही आहे. तेथे नदी आणि धबधबा अशा दोन्हींचा आनंद घेता येतो. वसई रोड स्थानकावरून एसटीने तुंगारेश्वरला जाता येते. डोंगरावर खाण्यापिण्याची सोय नसली तरी तुंगारेश्वर मंदिराजवळ खाण्या-पिण्याची सर्व सोय उपलब्ध असते. 
 
 
उद्या वाचा अहमदनगरमधील 'कश्मिर'ची माहिती....