मुंबई : मुंबई पोलीस दलात गेल्या सव्वा महिन्यापासून प्रलंबित असलेल्या वरिष्ठ निरीक्षकांच्या बढतींना अखेर ‘मुहूर्त’ मिळाला आहे. पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांनी ४२ निरीक्षकांना वरिष्ठ निरीक्षक म्हणून बढती देतानाच १५ जणांच्या बदल्या केल्या आहेत. त्यांच्यासह २४ सहायक आयुक्त (एसीपी) बढती मिळालेल्या अधिकाऱ्यांच्याही विविध विभागांत नियुक्त्या केल्या आहेत.येत्या दोन दिवसांत बढती झालेले अधिकारी नवनियुक्तीच्या ठिकाणी रूजू होतील. ३१ डिसेंबर रोजी मुंबईतील ४२ निरीक्षकांची एसीपी म्हणून बढती झाली होती. मात्र, तत्कालीन आयुक्त अहमद जावेद यांनी त्यांना ‘रिलिव्ह’ केले नव्हते. त्यांच्या निवृत्तीनंतर पदभार घेतलेल्या पडसलगीकर यांनी हा प्रलंबित प्रश्न निकालात काढत, त्यांच्या जागी सेवा ज्येष्ठतेच्या आधारावर ४२ निरीक्षकांना वरिष्ठ निरीक्षक म्हणून बढती दिली आहे.बदली झालेल्या अधिकाऱ्यांची नावेसुशील बंगाळे (वाहतूक), श्रीकांत मोहिते (पंतनगर), अरुण सातपुते (एमएचबी कॉलनी), सुधीर महाडिक (मालाड), आण्णासाहेब सोनूर (ट्रॉम्बे), दीपक कुंडल (पायधुनी), भास्कर जाधव (गोरेगाव), सुधीर नावगे (शिवडी), दत्तात्रेय शिंदे (देवनार), विजय कदम (आझाद मैदान), तानाजी सुरुळकर (भोईवाडा), बाबू मुखेडकर (सहार), प्रवीण मोरे (माहीम), ज्ञानेश देवडे (ताडदेव), पूनम वाणी (शाहूनगर).राजेंद्र मोरे ( विशेष शाखा-१), सुनील सोहनी( संरक्षण व सुरक्षा), सुनील भोसले (चुनाभट्टी), फुलदास यादव-भोये (संरक्षण व सुरक्षा), गंगाधर सोनावणे (शिवाजी पार्क), शैलेश पासलवार (खार), सूर्यकांत बांगर (धारावी), पंडित ठाकरे (वांद्रे), मिलिंद ईडीकर (विशेष शाखा-१), सुशील तांबे (वडाळा टीटी), राजेंद्र उबाळे (सशस्त्र पोलीस दल), पंडित थोरात (अंधेरी), अलका मांडवे (गुन्हे शाखा,सीएडब्यू), चांगदेव आवटे (सागरी पोलीस ठाणे), श्रीराम मोटे-पाटील (पूर्व नियंत्रण कक्ष), दत्ताराम सावंत (सशस्त्र पोलीस दल), सुभाष निकम (वाहतूक), अविनाश शिंगटे (भायखळा), संजय जाधव (विशेष शाखा-१), वासुदेव जमदाडे (निर्मलनगर),पोपट यादव (मरिन ड्राइव्ह), सतीश रावराणे (कस्तुरबा मार्ग), श्रीरंग मयेकर (विमानतळ),अहमद पठाण (एन.एम.जोशी मार्ग), पांडुरंग पाटील (मेघवाडी),महावीर तिबाटणे, राजेंद्र मुणगेकर ( दोघे सशस्त्र दल), तुकाराम काटे (वाहतूक),सूर्यकांत तरडे (सशस्त्र ), सतीश पाटील (वाहतूक), सरदार पाटील (टिळकनगर), किरण काळे (वर्सोवा), भगवान दराडे (संरक्षण व सुरक्षा), पराजी रेपाळे (गुन्हे शाखा), नेताजी भोपळे (गावदेवी), शरद पाटील (संरक्षण व सुरक्षा), राजेंद्र निकम (जोगेश्वरी),चंद्रकांत थळे राजेंद्र चिखले ,प्रकाश चव्हाण (तिघे दोघे सशस्त्र),भारत भोईटे (व्ही.बी.नगर), रामचंद्र जाधव (एमआयडीसी)सहायक आयुक्त (नियुक्तीचे ठिकाण) राजेंद्रसिंग परदेशी (विशेष शाखा-२), अब्दुल रौफ शेख (देवनार विभाग), अजिज माजर्डेकर (विशेष शाखा-१), भागवत सोनवणे, अशोक जगदाळे (दोघे सशस्त्र दल), अरविंद सावंत (गुन्हे शाखा), सुरेश मगदुम (सशस्त्र दल), राजेंद्र चव्हाण (यलोगेट विभाग), प्रशांत मर्दे (दहिसर), राजाराम प्रभू (संरक्षण व सुरक्षा), सुरेश सकपाळ (गुन्हे), शिरीष सावंत (गावंदेवी), विनोद शिंदे (आर्थिक गुन्हे), सुरेश पाटील (संरक्षण व सुरक्षा), ज्ञानेश्वर जवळकर (गुन्हे), जयराम मोरे (विक्रोळी), शंशाक सांडभोर (भांडुप), अजय पाटणकर (आर्थिक गुन्हे), सुनील कोवळेकर (आझाद मैदान).
मुंबईतील ४२ पोलीस अधिकाऱ्यांना वरिष्ठ निरीक्षक म्हणून बढत्या
By admin | Published: February 08, 2016 4:04 AM