लोकसभा निवडणुकीतील शिवसेनेचे मताधिक्य राजेश टोपेंची चिंता वाढवणारे

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2019 01:10 PM2019-07-10T13:10:31+5:302019-07-10T13:13:06+5:30

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजप-शिवसेनेची युती निश्चित झाली आहे. यामध्ये घनसावंगी मतदार संघ शिवसेनेच्या वाट्याला येणार हे निश्चित मानले जात आहे. त्या दृष्टीने हिकमत उढाण यांनी काम सुरू केले आहे.

Raising concern for Shiv Sena's vote in Lok Sabha elections from Ghansawangi worried for Rajesh Tope | लोकसभा निवडणुकीतील शिवसेनेचे मताधिक्य राजेश टोपेंची चिंता वाढवणारे

लोकसभा निवडणुकीतील शिवसेनेचे मताधिक्य राजेश टोपेंची चिंता वाढवणारे

googlenewsNext

मुंबई - लोकसभा निवडणुकीत भाजपप्रणीत एनडीएने मोठा विजय मिळवत पुन्हा एकदा सत्तेत पुनरागमन केले. या विजयामुळे महाराष्ट्रात शिवसेना आणि भाजप युतीचा आत्मविश्वास वाढला असून अवघ्या तीन महिन्यांवर विधानसभा निवडणूक आहे. लोकसभा निवडणुकीतील निकालामुळे विरोधी पक्षांची झोप उडाली असताना २०१४ मध्ये आपला विधानसभा मतदार संघ अभेद्य ठेवणाऱ्या आमदारांची चिंता वाढली आहे. या आमदारांमध्ये आता जालन्यातील घनसावंगी मतदार संघाचे राष्ट्रवादीचे आमदार राजेश टोपे यांचाही समावेश झाला आहे.

२०१४ लोकसभा निवडणुकीत राजेश टोपे यांनी मोदी लाटेतही घनसावंगीचा गड कायम राखला होता. जालना जिल्ह्यातून टोपे यांच्या रुपाने आघाडीला पाचपैकी एक जागा मिळाली होती. आता मात्र ही जागा लोकसभेच्या निकालानंतर आघाडीसाठी अडचणीची ठरण्याची शक्यता आहे. लोकसभेसाठी परभणी मतदार संघाचे शिवसेना उमेदवार संजय जाधव यांना घनसावंगी विधानसभा मतदार संघातून २४ हजारहून अधिक मतांची आघाडी मिळाली आहे. अर्थात यात भाजपची मतं मोठ्या प्रमाणात आहेत. मात्र भाजप-शिवसेना एकत्र लढल्यास राजेश टोपे यांना कडवे आव्हान मिळणार अशी चर्चा मतदार संघात आहे.

घनसावंगी मतदार संघातून राजेश टोपे सलग दुसऱ्यांना विजय झाले. २००९ मध्ये त्यांची लढत शिवसेनेविरुद्ध होती. तर २०१४ मध्ये त्यांना भाजप उमेदवार विलासबापू खरात यांनी चांगलीच झुंज दिली. ते दुसऱ्या स्थानी होते. टोपे यांना ९८ हजार ३० तर विलासबापू यांना ५४ हजार ५५४ मते मिळाली होती. तर शिवसेनेच्या हिकमत उढाण यांना ४५ हजार ६५७ मते मिळाली होती. घनसावंगी मतदार संघात काँग्रेसची ताकत फारशी नाही.

दरम्यान आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजप-शिवसेनेची युती निश्चित झाली आहे. यामध्ये घनसावंगी मतदार संघ शिवसेनेच्या वाट्याला येणार हे निश्चित मानले जात आहे. त्या दृष्टीने हिकमत उढाण यांनी काम सुरू केले आहे. त्यातच लोकसभेत शिवसेनाला मिळालेले मताधिक्य उढान यांचा उत्साह वाढविणारे आहे. तरी राजेश टोपे यांचा मतदार संघात असलेला दांडगा जनसंपर्क पाहिल्यास उढाण यांच्यासाठी ही लढाई वाटते तितकी सोपी नक्कीच नाही. साखर कारखाने, शिक्षण संस्था आणि सुतगिरणी यामुळे टोपे यांचे मतदार संघावर चांगली पकड आहे. त्यामुळे युतीत ही जागा कुणालाही सुटली तर युतीच्या उमेदवाराची लढत टोपे यांच्याशी होणार हे मात्र निश्चित आहे.

Web Title: Raising concern for Shiv Sena's vote in Lok Sabha elections from Ghansawangi worried for Rajesh Tope

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.