शहरं
Join us  
Trending Stories
1
Ajit Pawar: आर. आर. पाटलांवर गंभीर आरोप; वाद चिघळल्यानंतर अजित पवार म्हणाले...
2
"दाऊदशी संबंध जोडणाऱ्यांना नोटिस बजावणार’’, भाजपा नेत्यांना नवाब मलिकांचा इशारा 
3
अमित ठाकरेंना घेरण्याची 'उद्धव'निती; थेट मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना लिहिलं पत्र
4
'शरद पवार कुटुंब फुटू देणार नाहीत', छगन भुजबळांचं विधान
5
पडद्यामागून भाजपाची वेगळीच 'रणनीती'?; मागील निवडणुकीपेक्षा जास्त उमेदवार रिंगणात
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : ढसा ढसा रडले, १०० तासानंतर घरी परतले, कुठे गेले, कोणाला भेटले, श्रीनिवास वनगांनी काय सांगितलं?
7
एकेकाळी घराघरात कलर टीव्ही पोहोचविणाऱ्या BPL कंपनीच्या संस्थापकांचे निधन; टीपी गोपालन नांबियार काळाच्या पडद्याआड
8
'तेव्हा' आदित्यसाठी राज ठाकरेंना पाठिंबा मागितला नव्हता; महेश सावंत यांचा खोचक टोला
9
IND vs NZ : रोहित-विराट यांना काही वेळ द्या, ते मेहनत घेत आहेत - अभिषेक नायर
10
महाराष्ट्रात फक्त 'इतक्या' जागांवर AIMIM चे उमेदवार; काय आहे ओवेसींची रणनिती? पाहा...
11
काँग्रेसला आणखी धक्के बसणार? देवेंद्र फडणवीसांनी सगळेच सांगितले; म्हणाले, “आताच नावे...”
12
"वर्षा गायकवाड आणि त्यांच्या पतीने काँग्रेस विकली"; रवी राजांनंतर आणखी एका नेत्याचा गंभीर आरोप
13
बापरे! तरुणाने मोबाईल खिशात ठेवला अन् भयंकर स्फोट झाला, गंभीररित्या भाजला
14
IND vs NZ : भारताच्या पराभवानंतर अखेर गौतम गंभीरनं सोडलं मौन; टीम इंडियाच्या 'हेड'ची रोखठोक मतं
15
"धर्म की पुनर्रस्थापना हो...!"; दिवाळी निमित्त पाकिस्तान, बांगलादेश, अफगाणिस्तानातील हिंदूंना उद्देशून काय म्हणाले पवन कल्याण
16
समीकरण जुळले, आता ३ तारखेला जागा अन् उमेदवार ठरणार; मनोज जरांगेंची मोठी घोषणा
17
भारताचे 'जेम्स बाँड' अजित डोवाल यांची अमेरिकेशी महत्त्वाची चर्चा, देशाच्या सुरक्षेसंबंधी बोलणी
18
पीएम मोदींनी कच्छमध्ये जवानांसोबत साजरी केली दिवाळी, स्वतःच्या हाताने मिठाई खाऊ घातली
19
प्रचाराला जाताना ठाकरे गटाच्या उमेदवाराला आला हार्ट अटॅक; तातडीनं रुग्णालयात दाखल
20
जबरदस्त तिमाही निकालानंतर 'हा' शेअर सुस्साट; घसरत्या बाजारातही जोरदार तेजी

राज ठाकरेंना भेटण्याची इच्छा अपूर्ण राहिली...; शिक्षिका सुमन रणदिवेंनी घेतला अखेरचा श्वास

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2022 12:10 PM

तौत्के चक्रीवादळामुळे वसई येथील वृद्धाश्रमाला फटका बसला होता. त्यानंतर शिक्षिका सुमन रणदिवे हे नाव समोर आलं होतं.

वसई – राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे(Raj Thackeray) यांच्या शिक्षिका सुमन रणदिवे यांचं रविवारी रात्री निधन झालं. वयाच्या ८९ व्या वर्षी सुमन रणदिवे यांनी जगाचा अखेरचा निरोप घेतला. मागील अनेक महिन्यांपासून त्या सत्पाळा येथील न्यू लाइफ फाऊंडेशनमधील वृद्धाश्रमात राहत होत्या. दादरच्या बालमोहन विद्यालयात त्या शिक्षिका होत्या. वृद्धाश्रम संचालक राजेश मोरो यांनीच त्यांच्यावर विरार येथे सोमवारी सकाळी अंत्यसंस्कार केले. 

तौत्के चक्रीवादळचा पश्चिम किनारपट्टीला जोरदार तडाखा बसला होता. यात समुद्र किनाऱ्याजवळ मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. वसई येथील वृद्धाश्रमालाही वादळाचा फटका बसला. न्यू लाइफ फाऊंडेशनच्या पहिल्या मजल्यावरील खिडकीचा दरवाजा कोसळून एक वृद्ध नागरिक जखमी देखील झाले होते. त्यानंतर शिक्षिका सुमन रणदिवे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे मदत मागितली होती. त्या म्हणाल्या होत्या की, चक्रीवादळामुळे आमच्या वृद्धाश्रमाचं खूप नुकसान झालं. छप्पर उडालंय. सगळ्या वृद्धांना रात्री झोपायला त्रास होतो. मच्छर चावतात. उद्धव बेटा मला तुला भेटायचं आहे. तू शिवाजी पार्कमध्ये शाळेत असातना मी तुला शिकवलं होतं. इथली परिस्थिती खूप खराब आहे. कृपया आम्हाला मदत कर", असं आर्जव शिक्षिका सुमन यांनी केली होती.

बातमी वाचून राज ठाकरेंनी थेट फोन केला

या बातमीनंतर राज ठाकरेंनी थेट शिक्षिका सुमन रणदिवेंना फोन केला. सुमन यांनी त्यांच्याकडे आपलं गाऱ्हाणं माडलं. 'वादळामुळे खूप मोठं नुकसान झालंय. जास्तीत जास्त मदत कर,' अशी विनंती सुमन रणदिवे यांनी केली. त्यावर मी अविनाश जाधव यांना सांगितलं आहे. ते नक्की मदत करतील. तुम्ही काळजी करू नका, असं आश्वासन राज यांनी दिलं होतं. यावेळी कुंदा कशी आहे, अशी विचारणा रणदिवेंनी केली. त्यावर आई बरी आहे असं उत्तर राज यांनी दिलं होतं. त्याचसोबत शिक्षिका सुमन रणदिवेंनी राज ठाकरेंना भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यावर राज यांनी लॉकडाऊन संपल्यावर नक्की भेटू असं म्हटलं होतं. 

सुमन लक्ष्मीकांत रणदिवे (८९) या दादरच्या बालमोहन विद्या मंदिरात गणित आणि विज्ञान विषयाच्या शिक्षिका होत्या. १९९१ साली त्या निवृत्त झाल्या. गेल्या वर्षभरापासून त्या वसईतील न्यू लाइफ फाऊंडेशनच्या वृद्धाश्रमात राहत आहेत. वादळामुळे वृद्धाश्रमाची वास्तू मोडकळीस आली आहे आणि इथल्या अपुऱ्या सुविधांमुळे वृद्धांना खूप त्रास सहन करावा लागत आहे. सुमन रणदिवे यांनी मुख्यमंत्र्यांना भेटण्याची इच्छा करत मदतीसाठी आर्जव केलं होतं. यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी सुमन यांच्याशी फोनवरून संवाद साधला.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेRaj Thackerayराज ठाकरे