मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग (Param Bir Singh) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना एक पत्र लिहिले असून, अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी सचिना वाझे यांना दर महिन्याला १०० कोटी रूपये गोळा करण्यास सांगितले होते, असा खळबळजनक दावा त्यांनी केला आहे. या प्रकरणी भाजप आक्रमक झाला असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. गृहमंत्री अनिल देशमुख ह्यांनी तात्काळ राजीनामा द्यायलाच हवा, अशी मागमी राज ठाकरे यांनी केली आहे. (raj thackeray demands that anil deshmukh should resign over param bir singh letter)
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग ह्यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं पत्र अत्यंत धक्कदायक आहे. महाराष्ट्राच्या प्रतिमेला काळिमा फासणारी ही घटना आहे. गृहमंत्री अनिल देशमुख ह्यांनी तात्काळ राजीनामा द्यायलाच हवा आणि ह्या प्रकरणात त्यांची उच्चस्तरीय चौकशी देखील व्हायला हवी, अशी मागणी राज ठाकरे यांनी केली आहे.
मुख्यमंत्र्यांनी गृहमंत्री देशमुखांचा राजीनामा घ्यावा
परमबीर सिंग यांच्या आरोपांनंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर सडकून टीका केली आहे. सिंग यांनी केलेले आरोप केवळ खळबळजनक नाहीत, तर ते अतिशय धक्कादायक आहेत. डीजी दर्जाचा अधिकारी इतक्या गंभीर स्वरुपाचे आरोप करत आहेत. गेल्या काही महिन्यांपासून पोलीस दलात धक्कादायक घटना घडत आहेत. त्यामुळे पोलिसांचे मनोधैर्य खच्ची होत आहेत. पण ही घटना म्हणजे या प्रकरणातला कळस आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी त्यांचा राजीनामा घ्यावा, असे फडणवीस म्हणाले.
परमबीर सिंगांच्या पत्रातील सर्वांत महत्त्वाचे १० मुद्दे; शरद पवारांनाही माहिती असल्याचा दावा
परमबीर सिंगांना अटक करा
या प्रकरणात परमबीर सिंगांना अटक करा आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांचाही राजीनामा घ्यावा. त्यांची चौकशी करून त्यांच्यावर तातडीने कारवाई करावी. राज्य सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या सर्व प्रश्नांना रात्री जनतेसमोर खुलासा करण्याची आवश्यकता आहे, अशी मागणी करत अन्यथा मुख्यमंत्री या सर्व प्रकारात सहभागी आहेत की काय, अशी शंका जनतेच्या मनात येईल, असा दावा भाजप नेते अतुल भातखळकर यांनी केला आहे.
परमबीर सिंगना अटक करा आणि अनिल देशमुखांचा राजीनामा घ्या; भाजप आक्रमक
दरम्यान, टाईम्स नाऊने दिलेल्या वृत्तानुसार मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहिलं आहे. यामध्ये त्यांनी अनिल देशमुख यांनी सचिना वाझे यांना दर महिन्याला बार, रेस्तराँ आणि अन्य आस्थापनांमधून १०० कोटी रूपये गोळा करण्यास सांगितले होते, असा धक्कादायक तसेच गंभीर आरोप त्यांनी या पत्रातून केला आहे.