शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदानाच्या एक दिवस आधीच ठाकरे गटाला धक्का; डोंबिवलीतील नाराजीचा शिंदे गटाला फायदा
2
Maharashtra Election 2024: ‘या’ मतदारसंघांमध्ये विद्यमान आमदार लढवत नाहीये निवडणूक! काय आहेत कारणे?
3
अक्षय शिंदे चकमक: दंडाधिकाऱ्यांपुढे पुरावे ठेवण्यास उशीर का?; हायकोर्टाचे सीआयडीवर ताशेरे
4
Baba Siddique : ऑपरेशन बाबा सिद्दिकी डिकोड: App ने कॉन्टॅक्ट, जेलमधून शूटर्सचा इंटरव्ह्यू...; 'असा' रचला कट
5
T20I Record : टीम इंडियानं वर्ष गाजवलं अन् पाकिस्तानच्या संघानं 'लाजवलं'
6
पाकिस्तानात हाहा:कार! नऊ दहशतवाद्यांचा खात्मा, सात सुरक्षारक्षक ठार, सात पोलीस 'किडनॅप'
7
वंचितचे कळमनुरी मतदारसंघातील उमेदवार डॉ. दिलीप मस्के यांच्यावर हल्ला
8
सत्ताधारी सत्तेसाठी खालच्या थराला जात आहेत; देशमुखांवरील हल्ल्यानंतर शरद पवारांचा संताप
9
"...अन्यथा माझा बाबा सिद्दिकी व्हायला वेळ लागणार नाही", शरद पवार गटाच्या रमेश कदमांना जीवे मारण्याची धमकी 
10
नीरव मोदी-विजय माल्ल्यावर कारवाई होणार! PM मोदींनी ब्रिटनसमोर उपस्थित केला मुद्दा
11
ऐन निवडणुकीत पक्षाकडून निलंबन; सांगता सभेत शरद पवारांबद्दल काय म्हणाले राहुल जगताप?
12
"...तर उद्धव ठाकरे यांच्यावर FIR का दाखल होत नाही? त्यांना आत का टाकत नाही?"; रामदास कदम यांचा सवाल
13
मराठी-हिंदी गाणी गाणाऱ्या प्रसिद्ध गायकाने गमावलेला आवाज, २ वर्षांनी केला खुलासा
14
या सगळ्या अफवा! असित मोदींसोबतच्या भांडणावर जेठालालचं स्पष्टीकरण, म्हणाले- "मी हा शो सोडत नाहीये..."
15
कश्मिरा शाहचा अपघात नक्की कसा झाला? नणंद आरती सिंहने दिली माहिती; म्हणाली, "मॉलमध्ये..."
16
Mohammed Shami च्या फिटनेस टेस्टसाठी BCCI नं सेट केला नवा पेपर
17
'हे' ७ फॉर्म्युले डोक्यात फिट करा, कमाईसोबतच तुमचा पैसाही वाढेल; लोकही विचारतील, "हे कसं केलं?"
18
मोदी-ठाकरे-पवार-शिंदेंनी मैदान गाजवलं; सोलापुरात कुठे कोणत्या नेत्याच्या सभा झाल्या? जाणून घ्या
19
27000 सैनिक तैनात, अनेक जिल्ह्यात कर्फ्यू, इंटरनेट बंद; मणिपूरमध्ये नेमकं काय घडतंय?
20
भयानक! समुद्रकिनारी बसलेल्या माय-लेकी, अचानक लाट आली अन्...; थरकाप उडवणारा Video

राज ठाकरे नकलाकार : नाशिकचा चेहरा भाजपाने बदलला : देवेंद्र फडणवीस

By admin | Published: February 18, 2017 7:40 PM

राज ठाकरे दावा करतात की नाशिकचे ‘नवनिर्माण’ आम्ही केले; पण ते हे विसरतात की त्यांची महापालिका सक्षम नाही

नाशिक : राज ठाकरे दावा करतात की नाशिकचे ‘नवनिर्माण’ आम्ही केले; पण ते हे विसरतात की त्यांची महापालिका सक्षम नाही त्यामुळे महापालिकेचा खर्चाची रक्कमही राज्य-केंद्र सरकारने द्यावी, कुंभमेळा यशस्वी करायचा आहे, असे त्यांनीच मला सांगितले होते. सरकारने २२००कोटी रुपयांचा कुंभमेळा विकास निधी दिला आणि कुंभमेळा आदर्शपध्दतीने पार पडला. नाशिकचा चेहरा भाजपाने बदलला आणि मी वचन देतो नाशिकला मी दत्तक घेतो आणि नाशिकला गतवैभव पाप्त करुन दिल्याशिवाय राहणार नाही, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिककरांना देत ठाकरे बंधूंवर हल्ला चढविला.महापालिका निवडणूकीच्या निमित्ताने हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा भाजपाच्या वतीने आयोजित करण्यात आली होती. प्रारंभी सभेला गर्दीच नसल्याने शहरात पावणेपाच वाजेपासून दाखल झालेले फडणवीस यांना तब्बल तासभर प्रतिक्षा करावी लागली. पावणेसात वाजता फडणवीस यांनी माईक हातात घेतला यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, राज ठाकरे हे नकलाकार आहे, त्यांच्याकडे यापुढे नकलाच करण्याचे काम राहणार आहे. त्यांच्याक डे कल्पकबुध्दी आहे, हे चांगले आहे; मात्र दुर्देवाने ते त्या बुध्दीचा चांगला वापर करत नाही, असा टोला फडणवीस यांनी यावेळी लगावला. राज ठाकरे म्हणतात ‘बॉटनिकल गार्डन’ आम्ही केले; मात्र ते हे विसरतात की वनविभागाने तेथे खुप आगोदरपासून वनसंपदा जपून ठेवली होती तेथे ‘दिवाबत्ती’ रस्त्यांची सोय केली म्हणून ते गार्डन तुमचे झाले असे मुळीच नाही. नाशिकचे तात्यासाहेब ज्यांचा संपुर्ण महाराष्ट्राला हेवा वाटतो त्यांच्या नावाने असलेल्या कुसुमाग्रज उद्यानाच्या विकासासाठी सत्तेत नसताना ‘मनसे’ रस्त्यावर उतरली, चांगले केले मात्र सत्तेत आल्यानंतर कुसुमाग्रज उद्यानाचा त्यांना विसर पडला हे दुर्देवच आहे. कुसुमाग्रजांच्या नावाने आंदोलने करुन प्रसिध्दी मिळविली आणि भोळ्याभाबड्या नाशिककरांना थापा देऊन सत्ता मिळविली; मात्र आता सुज्ञ नाशिककर मनसेला नाशिकबाहेर काढल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वासही फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला.याप्रसंगी व्यासपिठावर जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे जलसंपदामंत्री गिरीष महाजन, आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा, आमदार देवयानी फरांदे, बाळासाहेब सानप, सीमा हिरे आदि उपस्थित होते.--फडणवीस यांच्या भाषणातील मुददे :* शेतकऱ्यांना केवळ कर्जमाफी नाही तर क र्जमुक्त करणे हा भाजपाचा उद्देश आहे.* शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे आणि ती आम्ही देणार.* नाशिकला फूड पार्क साकारून फळोत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांना ‘आधार’ देऊ.* शिवसेना-मनसेने खालच्या पातळीवर जाऊन ‘डीसी’ची यादी तयार करुन व्हायरल केली.* भाजपा राज्य व केंद्रात विकासाच्या नावावर सत्तेत आली आहे.* लबाडांच्या भुलथापांना बळी पडू नका.* लवकर महिंद्र कंपनी नाशकात १५०० कोटींची गुंतवणूक करुन नव्या रोजगाराची संधी उपलब्ध करुन देणार आहे.* विकासाकरिता नाशिक भाजपाला हवे आहे.* नाशिकमध्ये भाजपाला बहुमत मिळाल्यास नाशिकचे गतवैभव पुन्हा प्राप्त करु न दिल्याशिवाय राहणार नाही.* नाशिकला कोणी वाली नाही, असे म्हणणारे खुप आहे, पण मी नाशिकला आज दत्तक घेतले असून यापुढे नाशिक माझे आहे.*भाजपाची सत्ता आल्यास पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत शहरातील सर्व झोपडपट्टयांमधील गरीबांच्या घरांचा प्रस्ताव तयार करुन द्या, जेवढ्या घरांचा प्रस्ताव येईल, तेवढे घरे दिल्याशिवाय राहणार नाही. कारण ही ‘इंदिरा आवास योजना नाही’.*नाशिकच्या विमानतळावरून लवकरच विमानसेवा सुरू करण्यात येणार असून केंद्र सरकारच्या संबंधित मंत्रालयासोबत माझा संवाद सुरू आहे.