पुणे : खडकवासल्यात आलो की रमेश वांजळे यांची आठवण आल्याशिवाय राहत नाही अशा शब्दांत मनसे अध्यक्ष राज ठाकरे आपल्या कार्यकर्त्याच्या आठवणीने भावूक झाले.
पुण्यात आयोजित सभेमध्ये ते बोलत होते .ही सभा खडकवासल्याजवळील मैदानात घेण्यात आली. यावेळी व्यासपीठावर मनसेचे नेते अनिल शिदोरे,रीटा गुप्ता,अभिजीत पानसे,राजेंद्र वागस्कर, वसंत मोरे, रुपाली ठोंबरे पाटील आणि इतर नेते उपस्थित होते. याच खडकवासल्यात मनसेचा पहिला आमदार म्हणून वांजळे निवडून आले होते. महाराष्ट्राचा सोनेरी आमदार म्हणूनही त्यांची ख्याती होती. मात्र दुर्दैवाने त्यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यानंतर वांजळे यांच्या पत्नी हर्षदा आणि मुलगी सायली यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा आधार घेतला आहे. त्यावेळी ठाकरे यांनी त्याबद्दल खंतही व्यक्त केली होती. आज (गुरुवारी) पुण्यात झालेल्या सभेत त्यांनी वांजळे यांच्या आठवणींना उजाळा दिला. सभेत भाषण करताना त्यांचे पहिले वाक्य 'आज रमेश वांजळेंची आठवण येते. त्यांच्या रुपाने माझा वाघ गेला. इथे आलं की त्यांची आठवण आल्याशिवाय राहत नाही असेही ते म्हणाले.
त्यांनी यावेळी मांडलेले मुद्दे पुढीलप्रमाणे :देशाची कोणत्या बाबतीत सुधारणा झाली नाही, अपवाद फक्त अमित शहा यांच्या मुलाचा
मला उत्तर भारतात चार सभा घेण्याची विनंती, मात्र आपलं मराठी उत्तम
भाजपची २०१४च्या निवडणुकीपूर्वीची भाषा वेगळी, आता वेगळी
मोदी यांनी राजकीय खेळीसाठी स्वतःची जात काढली.