नाणारः कर्नाटकात मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांच्या शपथविधी सोहळ्यात दिलेल्या एकीबद्दल राज ठाकरेंनी समाधान व्यक्त केलं आहे. या सगळ्याचा गिअर मीच टाकला होता, असंही राज ठाकरे म्हणाले आहेत. यावेळी नाणार प्रकल्पग्रस्तांनीही त्यांची भेट घेतली. तसेच नाणार प्रकल्पग्रस्तांनी राज ठाकरेंकडे स्वतःची कैफियत मांडली.नाणार प्रकल्पग्रस्तांना आंदोलन करण्याबरोबरच सभा, बैठका घेता येऊ नयेत, यासाठीच जिल्हाधिकाऱ्यांकडून सातत्याने मनाई आदेश लागू केले जात आहे. आमचा आवाज दडपण्याचा डाव प्रशासनाचा असल्याचा आरोप नाणार प्रकल्पग्रस्तांनी केला आहे. त्यामुळे या सर्व प्रकाराची रितसर चौकशी करावी, अशी मागणी या प्रकल्पग्रस्तांनी राज ठाकरे यांच्याकडे केली.गुरुवारी राजापुरात आलेल्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची नाणार प्रकल्पग्रस्तांनी महामार्गावरील गुरुमाऊली हॉटेलच्या सभागृहात भेट घेतली व प्रशासनाकडून कशा प्रकारे दडपशाही सुरू आहे, त्याचा पाढा वाचला. आमच्या जमिनी हडपल्या जात आहेत, प्रकल्प लादण्यात आला आहे. त्याविरुद्ध बोलायचे नाही व प्रकल्पाच्याविरोधात सभा, बैठका घेता येऊ नयेत म्हणून जमावबंदी आदेश लागू करायचा, असे प्रकार गेले वर्षभर सुरू असल्याने आम्हाला तुमच्याकडे यावे लागल्याची भावना प्रकल्पग्रस्तांचे नेते नंदू कुलकर्णी यांनी व्यक्त केली.यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आता येथे हा विषय नको. पुढे काय करायचे ते बघतो, असे उत्तर दिले. यावेळी काही प्रकल्पग्रस्तांनी नेहमीप्रमाणे शिवसेनेवरदेखील निशाणा साधला. शिवसेनेकडून प्रकल्पाला विरोध असल्याचे दाखवले जाते, पण सहकार्य दिले जात नाही, अशीही टीका करण्यात आली. त्यावर मनसे अध्यक्षांनी ‘असे असतानाही तुम्ही त्यांनाच मते देता ना’, अशा शब्दात प्रकल्पग्रस्तांना हळूच चिमटाही काढला.भूमी कन्या एकता मंच मोर्चाला पाठिंबानाणार प्रकल्पाविरोधात दिनांक ३० मे रोजी काढण्यात येणाऱ्या भूमी कन्या एकता मंचच्या मोर्चाला आपला पाठिंबा असल्याचे राज ठाकरे यांनी स्पष्ट केले. यावेळी मंचाच्यावतीने राज ठाकरे यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनाची दखल निश्चित घेतली जाईल, असे राज ठाकरे यांनी सांगितले.
मोदी विरोधकांच्या एकीने राज ठाकरे खूश, काय म्हणाले बघा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2018 14:34 IST