मुंबई - ज्येष्ठ समाजवादी नेते आणि माजी केंद्रीयमंत्री जॉर्ज फर्नांडिस यांचे आज सकाळी निधन झाले. कामगार चळवळीचे नेतृत्व करणाऱ्या जॉर्ज फर्नांडिस यांना देशभरातून श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. दरम्यान, मनसेप्रमुख राज ठाकरे यांनीही आपल्या अनोख्या शैलीमध्ये जॉर्ज फर्नांडिस यांना श्रद्धांजली वाहिली आहे. राज ठाकरे यांनी जॉर्ज फर्नांडिस यांना श्रद्धांजली वाहणारे एक व्यंगचित्र प्रसिद्ध केले आहे. त्यात आपल्या प्रभावी भाषणांनी कामगार चळवळीचा अंगार पेटवणाऱ्या जॉर्ज फर्नांडिस यांच्या निधनामुळे दु:खी झालेला माईकसुद्धा आपल्या भावना रोखू शकलेला नाही, असे राज ठाकरे यांनी 'सम्राट' कायमचा 'बंद' झाला असे शीर्षक देऊन प्रसिद्ध केलेल्या आपल्या व्यंगचित्राच्या माध्यमातून दर्शविले आहे.
'सम्राट' कायमचा 'बंद' झाला! राज ठाकरे यांनी वाहिली जॉर्ज फर्नांडिस यांना श्रद्धांजली
By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2019 2:57 PM
कामगार चळवळीचे नेतृत्व करणाऱ्या जॉर्ज फर्नांडिस यांना देशभरातून श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. दरम्यान, मनसेप्रमुख राज ठाकरे यांनीही आपल्या अनोख्या शैलीमध्ये जॉर्ज फर्नांडिस यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
ठळक मुद्देमनसेप्रमुख राज ठाकरे यांनीही आपल्या अनोख्या शैलीमध्ये जॉर्ज फर्नांडिस यांना श्रद्धांजली वाहिली आहेराज ठाकरे यांनी 'सम्राट' कायमचा 'बंद' झाला असे शीर्षक देऊन एक व्यंगचित्र प्रसिद्ध करत जॉर्ज फर्नांडिस यांना श्रद्धांजली वाहिली आहेजॉर्ज फर्नांडिस यांनी केंद्रीय मंत्री या नात्याने उद्योग, रेल्वे आणि संरक्षण या खात्यांसह अनेक खात्यांचा कार्यभार त्यांनी सांभाळला होता