मुंबई - राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर भाषण करताना सरदार पटेलांचे नाव घेऊन राजकीय टीका करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींवर राज ठाकरे यांनी व्यंगचित्रामधून फटकारले लावले आहेत. पटेलांना डावलून नेहरूंना पंतप्रधान केल्याने पटेलांवर अन्याय झाल्याचे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस आणि नेहरू-गांधी घराण्यावर घणाघाती टीका करणाऱ्या मोदींना राज ठाकरे यांनी आज प्रसिद्ध केलेल्या नव्या व्यंगचित्रामधून इतिहास पढवला आहे. राज ठाकरे यांनी आज प्रसिद्ध केलेल्या व्यंगचित्रामध्ये महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू आणि सरदार पटेल हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर प्रकट झाल्याचे दाखवण्यात आले आहे. यावेळी महात्मा गांधी भारताचा इतिहास नावाचे पुस्तक हातात घेऊन आपल्यासमोर बसलेल्या मोदी आणि अमित शहा यांना इतिहास पढवत असून, नेहरू यांना काँग्रेसने नव्हे तर आपणच पंतप्रधान केल्याचे सांगत असल्याचे सांगत आहेत. तसेच नेहरू हे गृहमंत्री असते तरी ते काँग्रेसचे नेते असल्याचे ठणकावत असल्याचे दाखवण्यात आले आहे. गांधीजींचे हे वक्तव्य ऐकल्यावर नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचे चेहरे पाहण्यासारखे झाल्याचे दिसत आहे.
सरदार पटेलांवरून राजकारण कऱणाऱ्या मोदींना राज ठाकरेंनी व्यंगचित्रातून पढवला इतिहास
By ऑनलाइन लोकमत | Published: February 09, 2018 8:37 PM