ठाणे: आज झालेल्या मनसेच्या उत्तर सभेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. यावेळी त्यांनी जयंत पाटलांचा जंत पाटील असा उल्लेख केला. "मी जेव्हा उघडपणे बोलत होतो, तेव्हा हे काही बोलले नाहीत आणि आता जंत पाटील म्हणतात, राज ठाकरे उत्तर प्रदेशात कधी गेले होते. उत्तर प्रदेशाये यांना काय कौतुक? जंत पाटील माझे भाषण नीट ऐकत जा. मी म्हटलं होतं, ज्या बातम्या कानावर येत आहेत, उत्तर प्रदेशमध्ये विकास झाला असेल तर त्याचा मला आनंद आहे. मी जर तर बोलोलो होतो", असं राज ठाकरे म्हणाले.
ते पुढे म्हणाले, "तुम्हाला आठवत असेल तर 2014 च्या लोकसभा निवडणुकीवेळी मी सांगत होतो. मोदी पंतप्रधान होतील तेव्हा त्यांनी उत्तर प्रदेश, बिहार आणि झारखंडकडे लक्ष द्यावं. त्या तीन राज्यांचा विकास करावा, त्या राज्यातील माणसे महाराष्ट्रातात येतात. त्या माणसांचे ओझे महाराष्ट्र सहन करू शकत नाहीत."
"जंत पाटील नेहमी चकीतचंदू"यावेली राज ठाकरेंनी जयंत पाटलांची मिमिक्रीदेखील केली. "जंत पाटलांना काहीही सांगा ते नेहमी चकीतचंदू असतात. गृहमंत्री असताना मी त्यांना म्हटलं होतं, एकदा बेहराम पाड्यात जाऊन बघा, भीषण अवस्था आहे. तिकडे शस्त्र असतील, बॉम्ब असतील. हे नेहमी आश्चर्यचकीत असतात, यांना काहीच माहिती नसतं."
"आम्ही समोरच्या पक्षाला विझवतो"ते पुढे म्हणाले, "हे म्हणतात, संपलेल्या-विझलेल्या पक्षाबद्दल मी काय बोलणार. येऊन बघा, हा काय संपलेला पक्ष आहे का? जंतराव हा विझलेला पक्ष नाही, समोरच्याला विझवणारा पक्ष आहे. यांच्या मतदारसंघाबाहेर यांना कोणी विचारत नाही. त्या सुप्रिया सुळेंनी तर काहीच बोलायची गरज नाही. यांचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे सुळे वेगळे आहेत," असा घणाघात त्यांनी यावेळी केला.