ठाणे – गुढीपाडवा मेळाव्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी पुन्हा एकदा मशिदीवरील भोंगे हटवण्याबाबत राज्य सरकारला अल्टिमेटम दिले आहे. ३ मे रोजी रमजान ईद आहे. तत्पूर्वी राज्य सरकारने सर्व मौलवींना बोलावून भोंगे हटवण्याबाबत ठोस निर्णय घ्यावा अन्यथा ३ मेनंतर आम्ही हनुमान चालीसा लावणार म्हणजे लावणारच असा इशारा राज ठाकरेंनी दिला आहे.
राज ठाकरे म्हणाले की, हिंदुत्वाची भूमिका मी आज आणली नाही. पाकिस्तानी कलाकारांना हाकलवून देणारा पक्ष कोणता होता? मुंब्र्यातून अतिरेकी सापडले, वस्तरा कसा सापडेल, दाढीच करत नाही. आझाद मैदानावर रझा अकादमीनं काय धुडघूस घातला. पत्रकारांच्या गाड्या फोडल्या, महिला पोलिसांचा शारिरीक छळ केला. त्यावर कुणीही काहीही बोलले नाही. त्यावर मनसेना मोर्चा काढला. या मोर्च्यामुळेच पोलीस आयुक्त अरुण पटनायक यांना पदावरून काढण्यात आले. आम्ही भोंग्याची भूमिका कायम मांडली. कुठली दंगल तेढ निर्माण करायचा नाही. पण १२ ते ३ मे महाराष्ट्रातील भोंगे खाली ठरवल्यास आमच्या कडून कोणताही त्रास होणार नाही असं त्यांनी सांगितले.
दम असेल तर राज ठाकरेंना जेलमध्ये टाकून बघा; राजू पाटील यांचं अबू आझमींना 'ओपन चॅलेंज'
तसेच माझ्याबद्दल बोलले ईडीची नोटीस आली मी बदललो, आजही मला ईडीची नोटीस आली तरी जाईल पण ईडीनं नुसती संपत्ती जप्त केली तर पत्रकार परिषदेतून जाहीर शिव्या द्यायला लागले.तुम्ही शिवसेनेचे आहात की राष्ट्रवादीचे? अशा प्रवृत्तीच्या लोकांना आजोबा प्रबोधनकारांनी चांगलं वाक्य म्हटलं होतं, हे सगळे लवंडे आहेत अशा शब्दात राज ठाकरेंनी शिवसेना नेते संजय राऊतांचा समाचार घेतला.
घरचं लग्नकार्य सोडून वसंत मोरे ठाण्याला; राज ठाकरेंच्या सभेला हजर
मी भूमिका बदलत नाही
मला ईडीची नोटीस आली म्हणून ट्रॅक बदलला बोलतात, मी भूमिका बदलली नाही. मला ट्रॅक बदलायची गरज नाही. एका वर्षाच्या आत मी कोहिनूरमधून बाहेर पडलो. त्या कंपनीचा तपास सुरू झाला तेव्हा मला नोटीस आली आणि ईडीच्या कार्यालयात गेलो. ईडीच्या नोटिशीची चाहूल लागली तेव्हा शरद पवारांनी केवढं नाटकं केलीत. ज्यांनी पापच केले नाही मग ईडी नोटीस येवो किंवा अन्य काही मी भीक घालत नाही. ज्या गोष्टी मला नाही पटल्या ते जाहीरपणे बोललो. कलम ३७० रद्द केले त्यावर अभिनंदन करणारं पहिलं ट्विट माझं होते. पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी व्हावेत हे सांगणारा मी पहिला होतो. या देशात समान नागरी कायदा आणा, या देशातील लोकसंख्येवर नियंत्रण आणता येईल असा कायदा आणा अशा २ मागण्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पूर्ण कराव्यात असं राज ठाकरेंनी सांगितले.