शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
8
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
9
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
10
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
11
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
12
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
13
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
14
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
15
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
16
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
17
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
18
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
19
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

EVM विरोधात राज ठाकरेंचा पत्रप्रपंच; उद्धव ठाकरे, शरद पवारांना पत्र लिहून केले विरोध करण्याचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2018 1:46 PM

भारतीय जनता पक्षाला मिळालेले विजय इव्हीएममुळे मिळत असल्याचा आरोप करणाऱे मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी इव्हीएम विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे.

मुंबई - भारतीय जनता पक्षाला मिळालेले विजय इव्हीएममुळे मिळत असल्याचा आरोप करणाऱे मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी इव्हीएम विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. राज ठाकरे यांनी यासंदर्भात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे  आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पत्र लिहून इव्हीएमला विरोध करण्याचा आवाहन केले आहे.  दरम्यान, निवडणूक आयोगात सोमवारी बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीत काँग्रेस, व मित्रपक्ष विरुद्ध भाजप यांच्यात ईव्हीएमवरून जोरदार खडाजंगी झाली होती. निवडणुका ईव्हीएमद्वारे घ्याव्यात यावर भाजप ठाम असताना काँग्रेस व मित्रपक्षांनी मतपत्रिकांच्या वापराचीच मागणी केली होती. सहा तास चाललेल्या या बैठकीनंतर निवडणूक आयोगाने निष्पक्ष निवडणुकीचे आश्वासन दिले होती.  निवडणूक आयोगाने आयोगाने राजकीय पक्षांना प्रश्नावली पाठवून, त्यावर म्हणणे मागविले होते. ईव्हीएम मशीनची दुरुस्ती व देखभाल करणाऱ्या कंपन्यांची यादी सार्वजनिक करण्याची मागणी काँग्रेस व मित्रपक्षांनी केली. निवडणुकीच्या काळात राजकीय पक्षांकडून होणारा खर्चावर बंधने आणण्याची मागणी काँग्रेसने केली. राजकीय पक्षांच्या खर्चावर मर्यादा नसल्याने अन्य पक्षांच्या तुलनेत भाजपा पाण्यासारखा पैसा खर्च करत आहे. या खर्चावर अंकुश लागत नाही, तोपर्यंत निष्पक्ष निवडणुका होणार नाहीत, असे मत काँग्रेसने मांडले. बैठकीस सात राष्ट्रीय व ५१ प्रादेशिक पक्षांचे प्रतिनिधी आले होते. काँग्रेस, सपा, बसपा, आप, सीपीएम, सीपीआय, तृणमूल काँग्रेस यांनी ईव्हीएमला आक्षेप घेतला. मतपत्रिकांचा वापर शक्य नसल्यास व्हीव्हीपॅट वापर वाढवून प्रक्रिया पारदर्शी करावी, असे त्यांचे म्हणणे होते. बीएसपीचे नेते सतीश मिश्राम्हणाले की, मतपत्रिकाच वापराव्यात. ईव्हीएमवर आमचा विश्वास नाही. काँग्रेस व आपचे म्हणणे होते की, व्हीव्हीपॅटच्या २० ते ३० टक्के मतांची ईव्हीएममधी मतांशी पडताळणी करावी. गडबडीचे अनेक प्रकार समोर आले असून, त्याचा फायदा केवळ भाजपलाच होत आहे. अनेक विकसित देशांनी पुन्हा मतपत्रिकांनीच निवडणुका सुरू केल्या आहेत.

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेUddhav Thackerayउद्धव ठाकरेSharad Pawarशरद पवार