राज ठाकरे यांनी नुसता ढोल बडवू नये; प्रकाश आंबेडकर यांची महाधिवेशनावर टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2020 11:02 AM2020-01-25T11:02:36+5:302020-01-25T11:28:52+5:30

काँग्रेस सरकारच्या काळातही फोन टॅपिंग करण्यात आल्याचा आरोप केला.

Raj Thackeray you should not just play drums; Prakash Ambedkar's challenge | राज ठाकरे यांनी नुसता ढोल बडवू नये; प्रकाश आंबेडकर यांची महाधिवेशनावर टीका

राज ठाकरे यांनी नुसता ढोल बडवू नये; प्रकाश आंबेडकर यांची महाधिवेशनावर टीका

Next
ठळक मुद्देसरकारी कर्मचारी आलेल्या आदेशाला दुसऱ्यांदा नकार देऊ शकत नाही. ज्या ‘राजकीय मालकां’नी हवी तशी कारवाई करण्यास भाग पाडले त्यांची नावे-पत्ते घ्यावेत.

मुंबई : भारतात पाकिस्तानी आणि बांगलादेशी मुसलमान असल्याचा राज ठाकरे यांचा आरोप निराधार आहे. घुसखोरीबाबत बेछूट आरोप करण्याऐवजी त्यांनी देशात किती घुसखोर आहेत त्याचा आकडा द्यावा. घुसखोरीबाबतचे पुरावे द्यावेत. विनाकारण ढोल बडवत बसू नये, अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी गुरुवारी केली. 

देशातील घुसखोरांविरोधात मनसेने ९ फेब्रुवारीला मुंबईत मोर्चा काढणार असल्याचे जाहीर केले आहे. या मोर्चाबाबत आंबेडकर म्हणाले, राज ठाकरे यांच्या या बेछूट विधानांमुळे पोलीस आणि तपास यंत्रणांचे मनोबल खच्ची होते. ७० वर्षांपासून इथल्या प्रशासनाने सर्व आव्हाने पेलली. संकटे परतवून लावली. स्व प्रसिद्धीसाठी, राजकारणासाठी घुसखोरीचे आरोप केल्याने यंत्रणेच्या कार्यपद्धतीवरच आपण प्रश्नचिन्ह उपस्थित करीत आहोत. हेर खात्यातील लोक आपला जीव धोक्यात ठेवून काम करीत असतात. अशात देशात लाखो घुसखोर मुसलमान स्थायिक असल्याचे विधान जेव्हा केले जाते तेव्हा त्यांच्या कार्यपद्धतीवरच आपण प्रश्नचिन्ह उपस्थित करतो. राज यांनी आधी आकडे द्यावेत, पुरावे मांडावेत, असे आव्हान त्यांनी राज ठाकरे यांना दिले. काँग्रेस सरकारच्या काळातही फोन टॅपिंगचे प्रकार घडले आहेत. हिंमत असल्यास काँग्रेसने आमच्या काळात टॅपिंग झाले नसल्याचा दावा करावा, असे आव्हानही त्यांनी दिले. 


‘कोरेगाव भीमा प्रकरणी अभय द्या’कोरेगाव भीमा प्रकरणी सरकारी अधिकारी आणि पोलीस कर्मचाऱ्यांना राज्य सरकारने अभय द्यावे. तत्कालीन सरकारच्या इशाऱ्यावर तपास झाला होता. सरकारी कर्मचारी आलेल्या आदेशाला दुसऱ्यांदा नकार देऊ शकत नाही. तसे केल्यास त्याची नोकरी जाते. त्यामुळे सध्याच्या सरकारने अधिकारी, कर्मचाºयांना आधी अभय द्यावे. त्या बदल्यात ज्या ‘राजकीय मालकां’नी हवी तशी कारवाई करण्यास भाग पाडले त्यांची नावे-पत्ते घ्यावेत. या राजकीय मालकांवर कारवाई करावी, अशी मागणीही आंबेडकर यांनी केली.

कोरेगाव भीमा प्रकरणी जाणीवपूर्वक डाव्या कार्यकर्त्यांना गोवण्यात आल्याचा दावा शरद पवारांनी केला आहे. त्याची कागदपत्रेही आपल्याकडे पोहोचल्याचे त्यांनी सांगितले. शरद पवार यांनी ही कागदपत्रे जाहीर करावीत, अशी मागणीही आंबेडकर यांनी केली.

'हिंदुत्व पेलणे हा येरागबाळ्यांचा खेळ नाही'; सामनातून 'मनसे'वर टीकास्त्र

'कानाला आता त्रास होतो आहे का?'; मशिदीवरील भोंगे हटविण्यावरुन राज ठाकरेंवर निशाणा

राज ठाकरेंच्या भाषणातील 40 पैकी 20 मिनिटे हिंदूत्वावरच

मी मराठीच, माझा डीएनए भगवा! घुसखोरांविरुद्ध राज ठाकरे यांचा एल्गार

Web Title: Raj Thackeray you should not just play drums; Prakash Ambedkar's challenge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.