शहरं
Join us  
Trending Stories
1
"अशी पद्धत असते का?"; जयंत पाटलांचा फडणवीस-पवारांना सवाल
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शरद पवारांच्या उमेदवाराचा अर्ज बाद झाला? फहाद अहमद यांनी केला खुलासा; म्हणाले,...
3
"राजसाहेब, माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर अन्याय करू नका"; सदा सरवणकरांचं मोठं विधान
4
कोण होणार महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं, केली मोठी भविष्यवाणी!
5
चर्चा तर होणारच! भाजपाचा मुख्यमंत्री होईल असं राज ठाकरे म्हणाले अन् देवेंद्र फडणवीसांसोबतचे फोटो समोर आले!
6
नवाब मलिक यांच्या उमेदवारीबाबत ट्विस्ट: अजित पवारांच्या नव्या वक्तव्याने चर्चांना उधाण
7
कुडाळात महायुती, उद्धवसेनेचे कार्यकर्ते भिडले, तणावाचे वातावरण; पोलिस बंदोबस्त वाढविला
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'फडणवीसांनीच आरोप केले, त्यांनीच फाईल दाखविली'; सुप्रिया सुळे म्हणाल्या, आर. आर. पाटलांच्या कुटुंबाची माफी मागितली...
9
चीनच्या सैन्याची माघार, आता दिवाळीत तोंड गोड करणार; लष्कराने सीमेवरती स्थिती सांगितली
10
KL राहुलनं नाकारली LSG नं दिलेली ऑफर? हे कारण देत सोडलीये संघाची साथ
11
निवडणुकीपूर्वीच राज ठाकरेंना धक्का; मनसे उमेदवाराचा अर्ज छाननीत बाद, कारण...
12
दौरे ठरले! मल्लिकार्जून खर्गे अन् राहुल गांधी महाराष्ट्रात येणार; नागपूर, मुंबईत सभा होणार
13
भाजपचा विरोध, पण दादांनी..."; नवाब मलिकांनी सांगितलं काय घडलं राजकारण
14
भुजबळांच्या 'त्या' विधानावर राज ठाकरेंचा खोचक सल्ला, म्हणाले- "त्यांनी एक पक्ष काढावा आमचा...!"
15
'मैंने प्यार किया'ची सुमन वयाची पन्नाशी उलटली तरी आताही दिसते तितकीच ग्लॅमरस, पाहा फोटो
16
"महाराष्ट्राच्या प्रगतीचा भाजपा आणि महायुतीचा दावा फसवा आणि खोटा’’, नाना पटोले यांची टीका  
17
भाजपाचा प्रचारसभांचा धडाका! PM मोदी ८, अमित शाह २० सभा घेणार; योगी आदित्यनाथांच्या किती?
18
“मनसे सत्तेत येईल, आमच्या पाठिंब्यावर भाजपाचा मुख्यमंत्री होईल”; राज ठाकरेंचे स्पष्ट संकेत
19
रितेश देशमुखचा अमित व धीरज यांना पाठिंबा, विधानसभा निवडणुकीसाठी दिल्या खास शुभेच्छा!
20
मागच्या ५ वर्षांत महाराष्ट्रातील राजकारणात झालेल्या चिखलाला जबाबदार कोण? राज ठाकरेंनी दोन शब्दात दिलं उत्तर

भुजबळांच्या 'त्या' विधानावर राज ठाकरेंचा खोचक सल्ला, म्हणाले- "त्यांनी एक पक्ष काढावा आमचा...!"

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2024 4:40 PM

Maharashtra Assembly Election 2024 : राज ठाकरे म्हणाले, "कसं आहे आता, मुलंही आहेतच की आणि भुजबळही पुतण्यासोबतच गेले ना... ते थोडी काकांबरोबर थांबले. मला असं वाटतं की, किमान भुजबळांनी तरी काकांची साथ सोडायला नको होती. यावर तुमची सहानुभूती पुतण्यांसाठी आहे? असे विचारले असता राज म्हणाले, भुजबळांसांठी निश्चित नाही." 

छगन भुजबळ यांचे पुतणे माजी खासदार समीर भुजबळ यांनी अजित पवार गटाच्या मुंबई अध्यक्षपदाचा राजीनामा देत नांदगाव मतदारसंघातून शिवसेनेचे (शिंदे गट) उमेदवार आमदार सुहास कांदे यांच्या विरोधात अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यासंदर्भात योवला येथे पत्रकारांसोबत बोलता, शरद पवार यांचे पुतणे अजित पवार, अजित पवार यांचे पुतणे रोहित पवार, गोपीनाथ मुंडे यांचे पुतणे धनंजय मुंडे व बाळासाहेब ठाकरे यांचे पुतणे राज ठाकरे, अशा अनेक पुतणे कंपनीने आपल्या काकांचे ऐकलेच आहे, असे वाटत नाही. राजकारणात या पुतणे कंपनीचा डीएनए वेगळाच आहे, असे छगन भुजबळ यांनी म्हटले होते. त्यांच्या या विधानावरून आता, "भुजबळांनी एक पक्ष काढावा आमचा," असा खोचक सल्ला राज ठाकरे यांनी भुजबळांना दिला आहे. ते एबीपी माझ्यासोबत एका मुलाखतीत बोलत होते.

राज ठाकरे म्हणाले, "कसं आहे आता, मुलंही आहेतच की आणि भुजबळही पुतण्यासोबतच गेले ना... ते थोडी काकांबरोबर थांबले. मला असं वाटतं की, किमान भुजबळांनी तरी काकांची साथ सोडायला नको होती. यावर तुमची सहानुभूती पुतण्यांसाठी आहे? असे विचारले असता राज म्हणाले, भुजबळांसांठी निश्चित नाही." 

अजित पवारांची स्तुती -राज ठाकरे पुढे म्हणाले, "मला आजित पवारांसंदर्भातील एकच गोष्ट आवडते. मला त्यांचं बाकीचं राजकारण फारसं आवडत नाही अथवा बाकीच्या गोष्टीतर नाहीच आवडत. पण एक गोष्ट अजित पवारांची आवडते. त्यांनी जात-पात कधी मानली नाही किंवा जातीपातीच्या राजकारणात ते कधी अडकले नाही. म्हणजे शरद पवार आजपर्यंत जे करत आले, त्यात एवढ्या वर्षात अजित पवार कुठे, ही गोष्ट करताना तुम्हाला दिसणार नाहीत. ही मी बघत असलेली एक पॉझिटिव्ह गोष्ट आहे."

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Raj Thackerayराज ठाकरेChagan Bhujbalछगन भुजबळMNSमनसे