कोल्हापूर : आरक्षणाचे जनक राजर्षी छत्रपती शाहू महाराज देशाचे पंतप्रधान असते, तर ‘ओबीसीं’च्या समस्याच राहिल्या नसत्या. किंबहुना आजचे हे अधिवेशनही घेण्याची गरज नव्हती, असे प्रतिपादन ओबीसी सेवा संघाचे केंद्रीय अध्यक्ष प्रदीप ढोबळे यांनी शनिवारी येथे केले.ओबीसी सेवा संघाचे सातवे राज्य अधिवेशन येथील मुस्लीम बोर्डिंग येथे आयोजित करण्यात आले होते. या वेळी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. ढोबळे म्हणाले, राजर्षी शाहूंनी स्वातंत्र्यापूर्वी ४० वर्षे आरक्षण दिले; परंतु ओबीसी प्रवर्गाला आरक्षण मिळण्यासाठी स्वातंत्र्यानंतर ४० वर्षे झगडावे लागले. या वेळी गुजरातचे ओबीसी नेते जयंतीभाई मनानी, ज्येष्ठ संपादक सुनीलराव खोब्रागडे, आॅल इंडिया मुस्लीम आॅर्गनायझेशनचे अध्यक्ष शब्बीर अन्सारी, ओबीसी सेवा संघाच्या महिला अध्यक्षा मालती सुतार व अन्य मान्यवर उपस्थित होते. अधिवेशनात झालेले ठरावजातनिहाय जनगणना करण्यात यावी. ओबीसींसाठी स्वतंत्र आर्थिक तरतूद करण्यात यावी. ओबीसी प्रवर्गाला बॅँकांतून थेट कर्ज मिळावे. अनुसूचित जाती-जमातींच्या धर्तीवर स्वतंत्ररीत्या कायमस्वरूपी आयोग नेमावा. शासनाने ठरविलेल्या ओबीसीव्यतिरिक्त कुणबी किंवा धनदांडग्यांना आरक्षण देऊ नये.‘ओबीसी अॅप्स’चे अनावरण : ओबीसी सेवासंघाची समग्र माहिती असलेल्या मोबाइलच्या ‘ओबीसी अॅप्स’ची निर्मिती नरेंद्र गद्रे यांनी केली आहे. त्याचे अनावरण प्रदीप ढोबळे यांच्या हस्ते करण्यात आले.
राजर्षी शाहूंकडे देशाचे नेतृत्व हवे होते
By admin | Published: May 17, 2015 1:17 AM