शहरं
Join us  
Trending Stories
1
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
4
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
5
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
6
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
7
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
8
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
9
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
10
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
11
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
12
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
13
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
14
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
15
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
16
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
17
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
18
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
19
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
20
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य

रजनीश सेठ एमपीएससीच्या अध्यक्षपदी; रश्मी शुक्ला नव्या पोलीस महासंचालक

By ऑनलाइन लोकमत | Published: October 03, 2023 7:22 PM

Rashmi Shukla DGP News: राज्यातील नेत्यांचे फोन टॅपिंग करण्यात आल्याच्या कथित आरोपावरून ज्येष्ठ आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्यावर दाखल करण्यात आलेले दोन गुन्हे उच्च न्यायालयाने शुक्रवारी रद्द केले. यानंतर हालचाली सुरु झाल्या होत्या.

राज्यातील नेत्यांचे फोन टॅपिंग करण्यात आल्याच्या कथित आरोपावरून ज्येष्ठ आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्यावर दाखल करण्यात आलेले दोन गुन्हे उच्च न्यायालयाने शुक्रवारी रद्द केले. यानंतर चार दिवसांनी शुक्ला यांची महाराष्ट्रात वापसी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. रश्मी शुक्ला यांची महाराष्ट्राच्या नव्या पोलीस महासंचालक पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

डीजीपी रजनीश सेठ 31 डिसेंबरला निवृत्त होणार होते. त्यापूर्वीच राज्य सरकारने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) अध्यक्षपदी सेठ यांची नियुक्ती केली आहे. यानंतर शुक्ला या राज्यातील सर्वात वरिष्ठ आयपीएस अधिकारी असणार आहेत. त्या सध्या केंद्रीय प्रतिनियुक्तीवर सशस्त्र सीमा बलच्या महासंचालक म्हणून कार्यरत आहेत. रश्मी शुक्ला यांच्याकडे राज्याच्या पोलीस महासंचालक पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. 

उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत व राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांचे फोन टॅप केल्याप्रकरणी शुक्ला यांच्यावर एक गुन्हा दाखल करण्यात आला होता, तर दुसरा गुन्हा पुणे पोलिसांनी दाखल केला होता. काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांचा फोन टॅप केल्याप्रकरणी गुन्हा दाखल होता. हे सर्व गुन्हे रद्द केल्यानंतर आता शुक्ला यांना पुन्हा महाराष्ट्रात येण्याची संधी मिळणार आहे. 

टॅग्स :Rashmi Shuklaरश्मी शुक्लाPoliceपोलिस