शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
3
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
4
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
5
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
6
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
7
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
8
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
9
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
10
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
11
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
12
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
13
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
14
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
15
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
16
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
17
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
18
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
19
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?

आयएएसच्या बदल्यांवरून राजी-नाराजीचे सूर!

By admin | Published: January 06, 2015 2:18 AM

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अलिकडेच मोठ्या प्रमाणात केलेल्या आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांवरून राजी-नाराजीचे सूर उमटू लागले आहेत.

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अलिकडेच मोठ्या प्रमाणात केलेल्या आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांवरून राजी-नाराजीचे सूर उमटू लागले आहेत. काही बदल्या रद्द केल्या जातील की काय, अशी स्थिती निर्माण झाली आहे. नगरविकास विभागातून महसूल विभागात गेलेले मनुकुमार श्रीवास्तव (प्रधान सचिव) आणि महसूल मंत्री एकनाथ खडसे यांचे सूर कितपत जुळतील याबाबत विभागातील काही अधिकारी खासगीत शंका घेतात. प्रत्येक बाबतीत नियमावर बोट ठेवण्याचा श्रीवास्तव यांचा स्वभाव आहे. ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि नवे प्रधान सचिव (ऊर्जा) मुकेश खुल्लर यांच्याबाबतही असेच बोलले जात आहे. सतीश गवई यांना म्हाडातून आणून गृहनिर्माण विभागाचे प्रधान सचिव केल्याने गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता नाराज असल्याचे सांगण्यात येते. नगरविकास विभागात नितीन करीर आणि मनीषा म्हैसकर या दोन कार्यक्षम अधिकाऱ्यांना आणून मुख्यमंत्र्यांनी चांगला संदेश दिला आहे. या खात्यात गेली काही वर्षे सोपे काम किचकट करून निर्णय लांबविण्याचा पडलेला प्रघात आता तरी मोडला जाईल, अशी अपेक्षा आहे. महावितरणमधून पर्यावरण विभागात गेलेले अजय मेहता लवकरच प्रतिनियुक्तीवर केंद्रात जाणार अशी चर्चा आहे. गौतम चटर्जी, देवाशिष चक्रवर्ती, अश्विनी भिडे अशा काही कार्यक्षम अधिकाऱ्यांवर मुख्यमंत्र्यांनी अधिक विश्वास टाकल्याचे दिसते. तसेच मराठी अधिकाऱ्यांना महत्त्वाची पदे दिली आहेत. विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे अत्यंत जवळचे नातेवाईक एस. एस. झेंडे यांना आघाडी सरकारच्या काळात बरेचवेळा ‘साईड पोस्टिंग’ दिली गेली. मात्र, भाजपा सरकारने त्यांना हाफकिन इन्स्टिट्यूटमधून उचलून म्हाडाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकपद दिले आहे. तत्कालिन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे अत्यंत विश्वासू मानले गेलेले श्यामसुंदर शिंदे हे अशोक चव्हाण आणि नंतर पृथ्वीराज चव्हाण यांच्या कार्यकाळातदेखील सत्ताधाऱ्यांच्या नाराजीचे लक्ष्य बनले आणि त्यांना कमी महत्त्वाच्या पदांवर राहावे लागले. आता त्यांना पशुसंवर्धन आयुक्त पदावरून राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त या महत्त्वाच्या पदावर पाठविण्यात आले आहे. सूत्रांनी सांगितले की वादग्रस्त पार्श्वभूमी असलेल्या काही अधिकाऱ्यांकडे महत्त्वाची जबाबदारी सोपविताना त्यांच्याबाबत कोणतीही तक्रार येता कामा नये, अशी तंबी मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली आहे. अशा काही अधिकाऱ्यांना ‘क्रीम पोस्टिंग’ मिळाले असले तरी त्यांच्या कामावर बारकाईने नजर ठेवली जाणार आहे. (विशेष प्रतिनिधी)नाशिक जिल्हा परिषदेचे कार्यकारी अधिकारी म्हणून वर्धेचे उदय चौधरी यांना पाठविण्यात आले आहे. पण आधीचे कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर यांनाच कायम ठेवावे, अशी भूमिका ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे आणि नाशिकच्या भाजपा आमदारांनीही घेतल्याने ही चौधरींची बदली रद्द होण्याची शक्यता आहे.