शहरं
Join us  
Trending Stories
1
सरपंच-उपसरपंचांच्या वेतनात वाढ, ग्रामसेवक पदाचं नाव बदललं; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
2
गिरीश महाजनांविरोधात शरद पवारांचा उमेदवार ठरला! जयंत पाटलांकडून शिक्कामोर्तब
3
“मिस्टर संभाजी भोसले, ही रयत तुम्हाला राजा मानणार नाही”; लक्ष्मण हाकेंची बोचरी टीका
4
तिरुपती बालाजी मंदिराचे शुद्धीकरण, भगवान व्यंकटेश्वर स्वामींची मागितली माफी
5
टीम इंडियानं पाडला बांगलादेशचा बुक्का; मग चव्हाट्यावर आला पाक क्रिकेटमधील 'मॅटर'; जाणून घ्या सविस्तर
6
"त्याला आवर घालायचे काम तुमच्याकडून..."; नितेश राणेंच्या भाषेवरून शरद पवार संतापले, भाजपाला सुनावले
7
युक्रेन युद्धादरम्यान रशियाला मोठा धक्का, चाचणीदरम्यान फुटलं महाक्षेपणास्त्र
8
तिरुपती लाडू वाद: सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल; तपास समिती स्थापन करण्याची मागणी
9
'उद्धव ठाकरेंना बाहेर काढायचा प्रयत्न काँग्रेस करतंय'; चंद्रशेखर बावनकुळेंचा मोठा दावा
10
डेटिंग अ‍ॅपवरून ओळख, मुलावर जडलं प्रेम अन् एका फोनमुळे गमावले लाखो रुपये...
11
महिलांसाठी मोठी बातमी: लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता कधी मिळणार?; नवी माहिती समोर
12
डॉक्टर व्हायचेय, पण बजेट २० लाख आहे, मग या देशात होऊ शकता MBBS
13
मुख्यमंत्रिपद जाताच मनोहरलाल खट्टर यांनी केली होती काँग्रेसमध्ये प्रवेशाची तयारी, काँग्रेस नेत्यांचा दावा
14
"...मग तुमचा सत्तेत राहून उपयोग काय?", संभाजीराजे महायुती सरकारवर संतापले
15
Exclusive: अखेर झालं कन्फर्म, बिग बॉस मराठी १०० नव्हे ७० दिवसात संपणार; अधिकृत माहिती समोर
16
भारताच्या तुलनेनं श्रीमंत आहेत युरोपातील सर्वात गरीब देश; किती आहे लोकांचं उत्पन्न?
17
"मी मराठी आणि मुस्लिमांशी व्यवहार करत नाही", मुंबईच्या लोकलमधील 'टीसी'चं संभाषण व्हायरल; वादाला फोडणी!
18
मुलांना नक्की दाखवा...! त्सूचिन्शान एटलास धूमकेतू येतोय पृथ्वीच्या जवळ; या तारखेपासून होणार दर्शन
19
शेजारी अरविंद केजरीवालांची खुर्ची, पदभार स्वीकारताच आतिशी म्हणाल्या, "मी भरताप्रमाणे…’’  
20
IND vs BAN : अन् हिटमॅन रोहितनं फुकला मंत्र; व्हिडिओ व्हायरल

राज यांच्या कृष्णकुंजवर खडाजंगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2017 3:50 AM

एकीकडे लागोपाठचे पराभव आणि दुसरीकडे जुनीच दुखणी अशा कात्रीत सापडलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण

मुंबई : एकीकडे लागोपाठचे पराभव आणि दुसरीकडे जुनीच दुखणी अशा कात्रीत सापडलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची गुरुवारी ‘कृष्णकुंज’वर झालेली बैठक भलतीच वादळी ठरली. पक्षप्रमुख राज ठाकरे यांना प्रथमच पदाधिकाऱ्यांच्या परखड मतांचा आणिं रोषाचा सामना करावा लागला. लोकसभा, विधानसभा आणि महापालिका निवडणुकांमध्ये मनसेला मानहानीकारक पराभवाचा सामना करावा लागला. मुंबईसह अन्य महापालिका निवडणुकीतील पक्षाच्या खराब कामगिरीने मनसेच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. या पार्श्वभूमीवर गुरुवारी राज यांनी ‘कृष्णकुंज’वर पक्षाचे अन्य नेते आणि सरचिटणिसांची बैठक बोलावली. या बैठकीपूर्वी नेते-सरचिटणिसांनी मुंबईत विभागवार बैठका घेतल्या होत्या. त्यात पदाधिकाऱ्यांनी तीव्र भावना व्यक्त केल्या होत्या. पक्ष नेतृत्वाच्या शैलीवरूनही प्रश्न उपस्थित करण्यात आले. या सर्वाचे पडसाद कृष्णकुंजमधील बैठकीतही उमटले.पक्षातील नाराजी परखडपणे मांडताना, तुमच्याकडून विविध विषयांवर पक्षाची भूमिकाच समोर येत नाही, असा थेट हल्ला मनसे पदाधिकाऱ्यांनी राज ठाकरे यांच्यावर चढविला. यावर, मी भूमिका मांडतो. पण तुम्हीच माझी भूमिका लोकांपर्यंत पोहोचवायला कमी पडता, असा पलटवार राज यांनी केला. निवडणुकीत उमेदवार ठरविण्याच्या प्रक्रियेवरही काही नेत्यांनी आपली नाराजी व्यक्त केली. शिवाय, पक्षाच्या विरोधात काम करणाऱ्यांवरील कारवाईचा मुद्दाही चर्चेला आला. मुंबईतील बदलती समीकरणे पाहता मराठीप्रमाणेच अन्य भाषिकांनाही जवळ करण्याची आवश्यकता असल्याची भावना काही नेत्यांनी व्यक्त केली. यावर, मराठीचा मुद्दा अजिबात सोडणार नाही. उलट तो अधिक आक्रमक करणार असल्याचा इरादा राज यांनी व्यक्त केला. मी मराठीचा मुद्दा सोडू शकत नाही, भले मला लोकांनी मते देऊ देत किंवा नाही, असा पवित्रा राज यांनी घेतला. तसेच पदाधिकाऱ्यांना त्यांच्या मानमर्यादा आणि कर्तव्यांचीही जाणीव करून दिली. (प्रतिनिधी)