मुंबई : कीर्तनच्या माध्यमातून अनेक विषयांवर परखड मत व्यक्त करणारे निवृत्ती महाराज इंदुरीकर मुला-मुलींच्या जन्माबाबत केलेल्या विधानावरून वादात साडपले आहेत. यावरून आता राजकीय प्रतिक्रिया येत असून, लिंग भेदाबाबत इंदुरीकर महाराजांच वक्तव्य चुकीचेच असल्याचं शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी म्हंटल आहे.
स्त्री-पुरुष हा भेदभाव करणे चुकीचे आहे. महिलांचा सन्मान करायला सगळ्यांनी शिकलं पाहिजे. आधीच आपल्याकडे स्त्री लिंगाच गर्भपात करण्याचे प्रमाण वाढले आहे, आणि अशा परिस्थितीत पुन्हा अशा प्रवृत्तीला चालना मिळेल किंवा प्रोत्साहन मिळेल अशा प्रकारचं वक्तव्य इंदुरीकर महाराजांसारख्या व्यक्तीने टाळले पाहिजे, असे शेट्टी म्हणाले.
तर देवसेंदिवस महिला लोकसंख्या कमी होत आहे. गर्भातच तिला नाकरल जाते ही परिस्थिती वाईट आहे.त्यामुळे महिलांचा जन्मदर वाढवण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. तर याचा फटका शेतकऱ्यांना बसत असून प्रत्येक गावात 35-45 वयोगटातील मुलांना लग्नासाठी मुलीच मिळत नाही. मुलींची संख्या कमी असल्याने निवड करतांना सगळ्यात शेवटी नंबर शेतकऱ्यांच्या लागत असल्याचेही शेट्टी म्हणाले.