कोल्हापूर : ‘अच्छे दिन’ येतील म्हणून भुलून आम्ही भाजपवाल्यांच्या मागे गेलो; परंतु प्रत्यक्षात आमच्या वाट्याला कडकडीत ऊनच आले. सरकार जर आमच्या प्रश्नांना न्याय देणार नसेल तर ते उलथवून टाकण्याची ताकद चळवळीत आहे, असा सज्जड इशारा भाजपचा मित्रपक्ष असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक खासदार राजू शेट्टी यांनी गुरुवारी येथे सभेत दिला. कृषिराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या उपस्थितीतच शेट्टी यांनी केंद्र व राज्य सरकारी कारभारावर आसूड ओढला.राज्य सरकारने शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा करावा व प्रतिटनास ५०० रुपयांचा दुसरा हप्ता द्यावा; अन्यथा २२ मेपासून पुण्यातून हजारो शेतकरी चालत मुंबईला राजभवनवर धडक देऊन आत्मक्लेश आंदोलन करतील, असे शेट्टी यांनी यावेळी जाहीर केला. स्वाभिमानी शेतकरी संघटना युवा आघाडीच्या वतीने २८ एप्रिलपासून जिल्ह्यातील ३५० गावे व १२५० किमी फिरून आलेल्या मोटारसायकल रॅलीचा समारोप कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जाहीर सभेने झाला. तत्पूर्वी दसरा चौकातून शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली कर्जमुक्ती मोर्चा काढण्यात आला. (प्रतिनिधी) माझे मंत्रिपद कुणाच्या मेहेरबानीवर नव्हे - खोतहा सदाभाऊ चळवळीच्या मुशीतून तयार झालेला नेता आहे. मी शांत आहे याचा अर्थ कमजोर आहे, असा नव्हे. या चळवळीने, तुम्ही शेतकऱ्यानी मला घडवलं. तुम्हीच नेतृत्व दिलं आणि सत्तेत बसवलं. कुणाच्या मेहरबानीवर मला मंत्रिपद मिळालेले नाही, असा टोला सदाभाऊ खोत यांनी यावेळी लगावला.
राजू शेट्टींची २२ मे पासून आत्मक्लेश पदयात्रा
By admin | Published: May 05, 2017 4:13 AM