दूध आंदोलनाला यश, लिटरमागे २५ रुपये दर; मुख्यमंत्री, गडकरींच्या बैठकीत निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2018 07:32 PM2018-07-19T19:32:36+5:302018-07-19T20:00:12+5:30

दूधाच्या दरात वाढ करावी यासाठी राज्यभर सुरू असलेल्या आंदोलनाची अखेर सरकारने दखल घेतली. दुधाला प्रतिलिटर २५ रुपये  दर देण्याची घोषणा गुरुवारी सरकारतर्फे करण्यात आली.

Raju Shetty's milk agitation, demands 5 rupees agree | दूध आंदोलनाला यश, लिटरमागे २५ रुपये दर; मुख्यमंत्री, गडकरींच्या बैठकीत निर्णय

दूध आंदोलनाला यश, लिटरमागे २५ रुपये दर; मुख्यमंत्री, गडकरींच्या बैठकीत निर्णय

googlenewsNext

नागपूर : दूधाच्या दरात वाढ करावी यासाठी राज्यभर सुरू असलेल्या आंदोलनाची अखेर सरकारने दखल घेतली. दुधाला प्रतिलिटर २५ रुपये  दर देण्याची घोषणा गुरुवारी सरकारतर्फे करण्यात आली. नागपुरात विधानसभा अध्यक्षांच्या बैठकीत संबंधित निर्णय घेण्यात आला.  २१ जुलैपासून हा निर्णय लागू होणार असून, दूध संघांना आता शेतक-यांना २५ रुपये भाव द्यावा लागणार आहे.  दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी विधानसभेत व राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी विधानपरिषदेत तशी घोषणा केली.
दुधाच्या दरात वाढ करण्यात यावी, यासाठी राजू शेट्टींच्या 'स्वाभिमानी शेतकरी संघटने'ने राज्यभरात आंदोलन सुरु केले आहे. या दूध आंदोलनाचा आजचा चौथा दिवस आहे. आंदोलनात दुधाचे टँकर रोखून, जाळपोळही झाली. सरकार आंदोलनाची दखल घेत नसल्याचे पाहून शेट्टी यांनी आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देत शेतक-यांनी आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहनही केले होते. राज्यभरातील अशा आंदोलनांची दखल घेत विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांच्या दालनात गुरुवारी दूध दरवाढीसंदर्भात बैठक पार पडली. बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, विरोधी पक्षनेते  राधाकृष्ण विखे पाटील, बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, दिलीप वळसे पाटील, जयंत पाटील, राजेश टोपे, सुरेश धस, राहुल मोटे, राहुल कुल, सतेज पाटील यांच्यासह काही दूध संघाचे प्रतिनिधीही उपस्थित होते. 
    या बैठकीत दुधाला २५ रुपये दर देण्याचा निर्णय झाला.  राज्य सरकार हे पाच रुपये दूध संघांना देईल आणि दूध संघांकडून हे पाच रुपये शेतकºयांना मिळतील. प्रत्येक दूध संघाला या पाच रुपयांचा लाभ शेतक-यांना देणं बंधनकारक असेल. याची अंमलबजावणी २१ जुलैपासून करावी लागेल. जानकर यांनी विधानसभेत घोषणा केल्यानंतर सदस्यांनी बाका वाजवून निर्णयाचे स्वागत केले. 
 
बैठकीत काय ठरले ? 

- पिशवी बंद दुधासाठी कोणतेही अनुदान नाही.
- पिशवीबंद दूध वगळून दुधाला प्रति लिटर ५ रुपये अनुदान. 
- अनुदान दूध पुरवठा करणारी संस्था किंवा रूपांतरण करणारी संस्था यापैकी एकालाच मिळेल.
- जे दूध भुकटी उत्पादक ५ रुपये प्रति लिटर लाभ घेतील त्यांना दूध भुकटी नियार्तीसाठी प्रोत्साहनपर अनुदान मिळणार नाही.



 

Web Title: Raju Shetty's milk agitation, demands 5 rupees agree

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.