मुंबई : राज्यसभेच्या सहा जागांसाठी शुक्रवारी (दि.१०) मतदान झाले. या निवडणुकीसाठी राज्यात कमालीची चुरस पाहायला मिळाली. या निवडणुकीत २८५ आमदारांनी मतदान केले. परंतु मतमोजणीवेळी नाट्यमय घडामोड घडली. रात्री उशिरा झालेल्या मतमोजणीत पहिल्या पसंतीची मतं घेऊन शिवसेनेचे संजय राऊत, राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल, काँग्रेसचे इम्रान प्रतापगढी आणि भाजपचे पीयूष गोयल व अनिल बोंड विजयी झाले आहेत. आता सहाव्या जागेसाठी शिवसेनेच्या संजय पवार आणि भाजपच्या धनंजय महाडिक यांच्यात लढत सुरू आहे.
संजय राऊत यांना पहिल्या पसंतीची 41 मते मिळाली आहे. तर प्रफुल्ल पटेल यांना 43 मते, पीयूष गोयल यांना 48 मते, अनिल बोंडे यांना 48 मते आणि इम्रान प्रतापगढी यांना 44 मते मिळाली आहे. तर सहाव्या जागेसाठी शिवसेना आणि भाजपमध्ये चांगलीच चुरस निर्माण झाली असून शिवसेनेच्या संजय पवार यांना पहिल्या पसंतीची 33 मते तर भाजपच्या धनंजय महाडिक यांना 23 मते मिळाली आहेत.
महाराष्ट्रातील सहा जागांवर भाजपकडून पीयूष गोयल, अनिल बोंडे आणि धनंजय महाडिक यांना उमेदवारी देण्यात आली होती. तर, शिवसेनेकडून संजय राऊत, संजय पवार, राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रफुल पटेल आणि इमरान प्रतापगढी यांना उमेदवारी दिली होती. पियूष गोयल, अनिल बोंडे, संजय राऊत, प्रफुल पटेल आणि इमरान प्रतापगढी यांच्यासह यांचा विजय झाला आहे.
दरम्यान, शुक्रवारी मतदानानंतर सांयकाळी सहाच्या दरम्यान निकाल लागणे अपेक्षित होते. परंतु महाविकास आघाडीची तीन मतं अवैध ठरवावीत अशी भाजपने केलेल्या तक्रारीची दखल केंद्रीय निवडणूक आयोगाने घेतली. भाजपने राज्यसभेच्या निवडणूक प्रक्रियेवर आक्षेप घेत केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. जितेंद्र आव्हाड, यशोमती ठाकूर आणि सुहास कांदे यांचे मत बाद करावे अशी मागणी भाजपने केली होती. त्यानंतर अपक्ष आमदार रवी राणा आणि भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांच्या मतांवर महाविकास आघाडीकडून आक्षेप घेण्यात आला. या संपूर्ण गोंधळात सात तासांपासून निकाल रखडला होता.
सुहास कांदे यांचे मत बादभाजपने केलेल्या तक्रारीनंतर शिवसेनेच्या सुहास कांदे यांचे मत बाद ठरवण्यात आले. तर यशोमती ठाकुर, जितेंद्र आव्हाड या महाविकास आघाडीच्या आणि सुधीर मुनगंटीवार आणि रवी राणा या भाजपच्या आमदारांचे मत वैध असल्याचा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगाने दिला. सुहास कांदे यांचे मत बाद ठरल्याने शिवसेनेच्या मताचे गणित बिघडल्याचे म्हटले जात आहे.