मुंबई - राज्यसभेच्या ५६ जागांसाठी १६ राज्यात २७ फेब्रुवारीला मतदान हाेणार असून, राज्यातील सहा जागांपैकी सहकारी पक्षांच्या मदतीने पाच जागा जिंकण्यासाठी भाजपकडून रणनीती आखण्यात येणार आहे. त्याचवेळी महाविकास आघाडीला दोन जागा जिंकण्यासाठी कसरत करावी लागणार आहे. राज्यसभा निवडणुकीत खुले मतदान असल्याने राज्यात पक्षादेशाचा (व्हीप) महत्वाचा ठरणार आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतरची ही पहिलीच निवडणूक आहे.
विजयाचे गणित कठीण, ठाकरे गटाची होणार कोंडीभाजपचे आमदार गोवर्धन शर्मा यांच्या निधनामुळे विधानसभेची एक जागा रिक्त आहे. त्यामुळे राज्यसभा निवडणुकीसाठी विधानसभेतील २८७ आमदार मतदान करतील. या निवडणुकीत विजयासाठी ४२ मतांचा कोटा आवश्यक आहे. आता राजकीय परिस्थिती बदलली आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेकडे १५ ते १६ आमदार तर शरद पवारांकडे ११ आमदार आहेत. त्यामुळे या दोन्ही गटांना निवडणुकीत विजयाचे गणित जमविणे अवघड आहे. अशातच उद्धव उद्धव ठाकरे गटाला शिंदे गटाचा व्हीप लागू होणार असल्याने ठाकरे गटाची कोंडी होणार आहे.
महाराष्ट्र विधानसभेतील पक्षीय बलाबलभाजप : १०४, राष्ट्रवादी (अजित पवार गट) : ४२. शिवसेना (एकनाथ शिंदे गट): ४०, काँग्रेस : ४५, शिवसेना उद्धव ठाकरे गट : १६ राष्टवादी काँग्रेस (शरद पवार गट) : ११, बहुजन विकास आघाडी : ३, समाजवादी पक्ष, एआयएम आणि प्रहार जनशक्ति प्रत्येकी २, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, सीपीआयएम, शेकाप, स्वाभिमानी पक्ष, रासप, जनसुराज्य शक्ति, क्रांतीकारी शेतकरी पक्ष प्रत्येकी १ आणि अपक्ष १३... एकूण २८७
...तर अध्यक्षांचा निर्णय राष्ट्रवादीला लागूnशिवसेनेनंतर राष्ट्रवादीमधील फुटीनंतर दोन्ही गटाची निवडणूक आयोग व विधिमंडळात लढाई सुरु आहे. त्याबाबतचा निर्णय राष्ट्रवादीला या निवडणुकीसाठी लागू हाेईल.nशिंदेंच्या शिवसेनेला आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला जागा मिळणार का हा प्रश्न आहे. शिंदे यांच्याकडे ४० आणि १० अपक्ष तर पवार यांच्याकडे ४२ आमदार आहेत. अपक्षांचे गणित जुळल्यास दोघांचाही एक-एक उमेदवार निवडून येऊ शकतो.