राज्यसभा निवडणूक : काँग्रेसकडून केतकरांना उमेदवारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2018 05:38 AM2018-03-12T05:38:05+5:302018-03-12T05:38:05+5:30

राज्यसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे, तर भाजपाने तिसºया जागेसाठी केरळ भाजपाचे प्रदेशाध्यक्ष व्ही. मुरलीधरन यांना उमेदवारी दिली आहे.

 Rajya Sabha election: Congress nomination for Ketkar | राज्यसभा निवडणूक : काँग्रेसकडून केतकरांना उमेदवारी

राज्यसभा निवडणूक : काँग्रेसकडून केतकरांना उमेदवारी

Next

मुंबई - राज्यसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे, तर भाजपाने तिसºया जागेसाठी केरळ भाजपाचे प्रदेशाध्यक्ष व्ही. मुरलीधरन यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे ही निवडणूक आता बिनविरोध होण्याची शक्यता आहे.
राज्यसभेसाठी महाराष्ट्रातून सहा जागांवर निवडणूक होत आहे. भाजपाकडून प्रकाश जावडेकर, नारायण राणे आणि मुरलीधरन हे तिघे तर शिवसेनेकडून अनिल देसाई, राष्ट्रवादीकडून वंदना चव्हाण, तर काँग्रेसकडून कुमार केतकर हे उमेदवार निवडणूक रिंगणात असतील. या
सहा जागांसाठी येत्या २३ मार्च रोजी निवडणूक होत आहे.

त्रिपुरातील पराभवानंतर केरळवर लक्ष

भाजपाच्या तीनपैकी जावडेकर आणि राणे यांच्या उमेदवारीनंतर तिसºया जागेसाठी व्ही. मुरलीधरन यांच्या नावावर पक्षनेतृत्वाने शिक्कामोर्तब केला आहे. ते त्रिपुरात कम्युनिस्ट पक्षाचा पराभव केल्यानंतर, भाजपाने केरळवर लक्ष केंद्रित केले आहे.

महाराष्ट्रातून काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेची प्रत्येकी
एक जागा निवडून येवू शकते, तसेच प्रदेश काँग्रेसने रत्नाकर महाजन यांचे नाव श्रेठींकडे सुचविले होते. मात्र, ऐन वेळी दिल्लीतून ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांचे नाव जाहीर
झाले. पक्षाध्यक्ष राहुल गांधी परदेश दौºयावरून परतल्यानंतर, राज्यसभेच्या उमेदवारांवर शिक्कामोर्तब झाले. केतकर हे
काँग्रेस विचारधारेचे कट्टर समर्थक मानले जातात.

अंतिम तारीख : १२ मार्च, सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत. निवडणूक लढविली गेल्यास, २३ मार्च २०१८ रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत मतदान घेण्यात येईल.

Web Title:  Rajya Sabha election: Congress nomination for Ketkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.